संघर्षयात्रेचा संघर्ष चालूच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2016 12:09 PM2016-02-18T12:09:56+5:302016-02-18T05:09:56+5:30
साकार राऊत दिग्दर्शित संघर्षयात्रा या मराठी चित्रपटाला रिलिज होण्यासाठी अजून किती संघर्ष करावा लागेल काही सांगता येत नाही. कारण ...
ाकार राऊत दिग्दर्शित संघर्षयात्रा या मराठी चित्रपटाला रिलिज होण्यासाठी अजून किती संघर्ष करावा लागेल काही सांगता येत नाही. कारण हा चित्रपट ११ डिसेंबर २०१५ रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता. परंतु काही तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलल्यांच सांगण्यात आलं. यानंतर हा सिनेमा १९ फ्रेबु्रवारीला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु या तारखेला ही पुढे ढकलण्यात आल्याचे कळते. हा चित्रपट भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर चित्रित केलेला आहे. या चित्रपटात शरद केळकर गोपीनाथ मुंडे यांच्या भूमिकेत असून, पंकजा मुंडे यांची भुमिका श्रुती मराठे साकारते आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी सेन्सॉर बोर्डाला रीतसर पत्र लिहून चित्रपटाला प्रमाणपत्र न देण्याची सूचना केली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पुन्हा एखदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.