सुबोध भावेच्या घरातही कोरोनाचा शिरकाव, पत्नी, मुलासह अभिनेत्याला लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 02:03 PM2020-08-31T14:03:10+5:302020-08-31T14:03:35+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेच्या घरातही कोरोनाने आता शिरकाव केला आहे. ही माहिती खुद्द त्यानेच सोशल मीडियावर दिली आहे.

Corona infestation in Subodh Bhave's house also infected the actor along with his wife and child | सुबोध भावेच्या घरातही कोरोनाचा शिरकाव, पत्नी, मुलासह अभिनेत्याला लागण

सुबोध भावेच्या घरातही कोरोनाचा शिरकाव, पत्नी, मुलासह अभिनेत्याला लागण

googlenewsNext

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशातही कोरोनाचे संकट अद्याप आहे. बॉलिवूडमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. बच्चन कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अभिनेता रितेश देशमुखची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसुझा-देशमुखलाही तीन आठवड्यांपूर्वी जेनेलियाला कोरोनाची लागण झाली होती. आता ती कोरोनामुक्त झालीय. यादरम्यान आता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेच्या घरातही कोरोनाने आता शिरकाव केला आहे. ही माहिती खुद्द त्यानेच सोशल मीडियावर दिली आहे. त्याच्यासोबत पत्नी आणि एका मुलाला कोरोनाची लागण झाली आहे.

सुबोध भावे याने ट्विटरवर सांगितले की, मी,मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला क्वारंटाइन करून घेतले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. गणपती बाप्पा मोरया.

सुबोध भावे आणि त्याचे कुटुंबीय कोरोनातून लवकर बरं व्हावे यासाठी चाहते देवाकडे प्रार्थना करत आहेत. सुबोध भावेच्या आधी जेनेलिया देशमुखला कोरोना झाल्याचे समोर आले होते.

तसेच महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, आराध्या बच्चन असे बच्चन कुटुंबातील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांना रूग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचाराअंती या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे.

Read in English

Web Title: Corona infestation in Subodh Bhave's house also infected the actor along with his wife and child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.