Corona Virus:अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा रंगकर्मींना मदतीचा हात, केली इतक्या लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 19:23 IST2020-04-22T19:20:06+5:302020-04-22T19:23:07+5:30
कोरोनामुळे नाट्यव्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही नाट्यगृहात सध्या खबरदारी म्हणून नाटकाचा एकही प्रयोग होत नाहीये..

Corona Virus:अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा रंगकर्मींना मदतीचा हात, केली इतक्या लाखांची मदत
कोरोनाव्हायरस या साथीच्या आजारामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टी प्रमाणे नाट्यसृष्टीवरही उपासमारीची वेळ आली आहे, विशेषत: जे बॅकस्टेजला राहून काम करतात त्यांच्यासमोर रोजीरोटीचे संकट आणखीनच तीव्र झाले आहे. या कठीण काळात अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद आता त्यांच्यासाठी आधार बनली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद तर्फे गरजुंना थेट ५० लाख रू. निधी देण्याचे प्रसाद कांबळी यांनी नुकतेच जाहिर केले आहे. जेणेकरून या संकटाच्या काळात त्यांच्या कुटुंबियांची मदत होऊ शकेल.
तसेच नाट्यनिर्मांत्यांनादेखील या संकटातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक सहाय्य करणार असल्याचे कार्यवाह राहुल भंडारे यांनी सांगितले. मात्र यासाठी नाट्यव्यवसाय पुन्हा सक्षमपणे सुरू झाल्यावर रसिकांनीदेखील आधार देण्याची गरज आहे.
तसेच या चर्चेत अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे संतोष कणेकर, सुशांत शेलार, मंगेश कदम,नाट्यनिर्माते अनंत पणशीकर, दिंगबर प्रभू, संतोष कोचरेकर,उदय धुरत ज्ञानेश महाराव, रंगमंच संघटनांचे रत्नाकांत जगताप आदी या सहभागी झाले होते. या सर्वांच्या संगमताने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांच्यावर कोरोनाव्हायरस लॉकडाऊनमुळे रोजीरोटीचे संकट उभे राहिले आहे. त्यांच्यासाठी नाट्यपरिषदेच्या या निर्णयाने नक्कीच रंगकर्मींच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुळे नाट्यव्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही नाट्यगृहात सध्या खबरदारी म्हणून नाटकाचा एकही प्रयोग होत नाहीये. अडचणीत सापडलेला हा व्यवसाय कधी सुरळीत होईल ह्याची अजून खात्री नाहीये पण तो पर्यंत रंगकर्मींना केलेली मदत ही नक्कीच कौतुकास्पद आणि सामाजिक जबाबदारीचे भान दर्शवणारी आहे. ही मदत मिळाल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नक्कीच एक दिलासादायक भाव उमटतील हे मात्र नक्की.