Corona Virus: कोरोनाचा फटका रंगमंच कामगारांना,नाटक व्यवसाय ठप्प झाल्याने कामगारवर्ग अडचणीत

By अजय परचुरे | Published: March 14, 2020 03:08 PM2020-03-14T15:08:31+5:302020-03-14T15:12:15+5:30

सर्व नाटकात नाटकाचे सेट लावणाऱ्या , संगीत ,प्रकाशयोजना , कपडेपट, वेशभूषा करणाऱ्या किमान 700 कामगारांना ह्याचा फटका बसलाय .

Corona virus : 'Disastrous' Effects on the theater Industry Too-AP | Corona Virus: कोरोनाचा फटका रंगमंच कामगारांना,नाटक व्यवसाय ठप्प झाल्याने कामगारवर्ग अडचणीत

Corona Virus: कोरोनाचा फटका रंगमंच कामगारांना,नाटक व्यवसाय ठप्प झाल्याने कामगारवर्ग अडचणीत

googlenewsNext

कोरोनाच्या भयाण वास्तव्यामुळे राज्य सरकारने रात्री 12 वाजल्यापासून चित्रपटगृह , माँल आणि नाट्यगृहे ठराविक काळापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव गर्दीच्या ठिकाणी होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतला मात्र ह्याचा मोठा फटका नाट्यव्यवसायाला आणि या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या रंगमंच कामगारांना बसला आहे . नाटकांचे प्रयोगच ठप्प झाल्याने या नाटकांच्या प्रयोगावर पोट असणाऱ्या किमान 700 कामगारांना नाटक बंद राहिपर्यंत हलाखीचे दिवस जगावे लागणार आहेत . 


कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे राज्य शासनाने खबरदारी म्हणून शहरातील मॉल्स , चित्रपटगृह आणि नाट्यगृह अनिश्चित काळापर्यंत बंद केली आहेत . मुळात नाट्य व्यवसाय सध्या सुट्टीच्या दिवशी आणि शनिवार - रविवार या दोन दिवशी तेजीत असतो . शनिवार आणि रविवार मुंबई , पुणे आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील नाट्यगृहात व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होत असतात . त्याप्रमाणे या शनिवारी आणि रविवारीही या नाट्यगृहात अनेक व्यावसायिक नाटकांचे प्रयोग महाराष्ट्रातील या नाट्यगृहात जाहीर झालेले होते . त्याप्रमाणे या नाटकांची आगाऊ तिकीटविक्री ही ऑनलाइन आणि करंटच्या माध्यमातून सुरू होती .

मात्र सरकारच्या या तातडीच्या निर्णयामुळे सर्व नाट्यगृहातील सर्व नाटकांचे प्रयोग रद्द झाले आहेत . मात्र यामुळे या सर्व नाटकात नाटकाचे सेट लावणाऱ्या , संगीत ,प्रकाशयोजना , कपडेपट, वेशभूषा करणाऱ्या किमान 700 कामगारांना ह्याचा फटका बसलाय . नाटकाचा प्रयोग झाल्यावर मिळणारी नाईट ही या कामगारांची हक्काची आणि मेहनातीची कमाई . मात्र अनिश्चित काळापर्यंत नाट्य प्रयोग बंद झाल्याने या सर्व रंगमंच कामगारांवर प्रयोग नाही तर नाईट नाही अशी वाईट वेळ आली आहे .

ह्यावर तोडगा म्हणून आणि रंगमंच कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून रंगमंच कामगार संघटनेने हवालदील झालेल्या या कामगारांना थोडासा दिलासा मिळावा म्हणून प्रत्येकी 2 हजार रुपये तात्पुरती मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या तात्पुरत्या मदतीमुळे रंगमंच कामगार संघ टनेचे जवळपास 8 लाख रुपये खर्च होणार आहेत . मात्र आमचा रंगमंच कामगार वाईट अवस्थेत असताना आम्हाला तात्पुरती का होईना ही मदत करणे गरजेचे आहे असं मत रंगमंच कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर वेल्हे ह्यांनी व्यक्त केले आहे .

तसेच रंगमंच कामगार संघटनेचं माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य रत्नाकांत जगताप ह्यांनी सांगितलं की तातडीने नाट्य निर्माता संघ आणि अखिल भारतीय नाट्य परिषद ह्यांच्या एकत्रित सह्यांचं निवेदन सरकारला देणार आहोत . सरकारने हातावर पोट असणाऱ्या या रंगमंच कामगारांना या आर्थिक मदत करावी आणि या कामगारांना लढण्याचे बळ द्यावे असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

Web Title: Corona virus : 'Disastrous' Effects on the theater Industry Too-AP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.