मराठी सिनेसृष्टीतील या कपलने मालदीवमध्ये केले व्हॅकेशन एन्जॉय, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 19:52 IST2019-12-17T19:52:33+5:302019-12-17T19:52:59+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतल्या या कपलच्या लग्नाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे.

मराठी सिनेसृष्टीतील या कपलने मालदीवमध्ये केले व्हॅकेशन एन्जॉय, पहा फोटो
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडपे अनिकेत विश्वासराव व स्नेहा चव्हाण यांच्या लग्नाला नुकतेच एक वर्षे पूर्ण झाले आहेत. अनिकेत फारसा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसला तरी त्याची बायको म्हणजेच अभिनेत्री स्नेहा चव्हाण इंस्टाग्रामवर सक्रीय आहे. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर त्यांच्या मालदीव व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत.
स्नेहा चव्हाण व अनिकेत विश्वासराव हे दोघे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी मालदीवला गेले होते. तिथले फोटो त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ते स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत.
तसेच स्नेहाने तिचा बिकनीतील सेल्फीदेखील इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
अभिनेता अनिकेत विश्वासराव व अभिनेत्री स्नेहा चव्हाण १० डिसेंबर, २०१८ साली लग्नबेडीत अडकले होते. त्यांचा विवाह सोहळा पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये पार पडला होता. हा विवाह सोहळा कुटुंब, जवळचे नातेवाईक व इंडस्ट्रीतील काही निवडक मित्रमैत्रिणींच्या उपस्थित पार पडला होता.
अनिकेत व स्नेहा हृद्यात समथिंग समथिंग या चित्रपटात एकत्र झळकले होते. या चित्रपटातील त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली आहे.
स्नेहा चव्हाण यापूर्वी लाल इश्क चित्रपट व सोनी मराठी वाहिनीवरील हृदयात वाजे समथिंक मालिकेत झळकली आहे. तर अनिकेतने बऱ्याच मराठी सिनेमांमध्ये काम केले आहे.