अभिनेत्रींच्या #Banlipstic व्हिडिओ मागचं सत्य आलं समोर,जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 11:14 AM2021-12-09T11:14:55+5:302021-12-09T11:15:34+5:30

सगळ्यात आधी Tejaswini Panditने मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही...म्हणत #Banlipstic व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही मोठा प्रश्न पडता होता.

Creators of Anuradha Webseries finds a unique way of promoting their webseries, check why Ban Lipstick in trending on Social media | अभिनेत्रींच्या #Banlipstic व्हिडिओ मागचं सत्य आलं समोर,जाणून घ्या कारण

अभिनेत्रींच्या #Banlipstic व्हिडिओ मागचं सत्य आलं समोर,जाणून घ्या कारण

googlenewsNext

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सेलिब्रेटी त्यांच्या खासगी आयुष्यात जे काही करतात त्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरुन चाहत्यांपर्यत पोहचत असतात. त्यांचे आगामी प्रोजेक्ट असो किंवा मग एखादी खास गोष्ट लगेच त्यावर चर्चा सुरु होते.  सध्या सोशल मीडियावर असाच एक ट्रेंड व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून #Banlipstic खूप ट्रेंडमध्ये होता. तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit)पासून प्राजक्ता माळी (Prajakta Mali) अशा अनेक नावाजलेल्या अभिनेत्रींना हा हॅशटॅग वापरत व्हिडीओ शेअर केले होते. सगळ्यात आधी तेजस्विनी पंडितने ''मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही...''म्हणत #Banlipstic व्हिडीओ शेअर केला होता.

हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही मोठा प्रश्न पडता होता. चाहतेच नाहीतर अनेक सेलिब्रेटी देखील संभ्रमात होते. व्हिडीओ व्हायरल होत असल्यामुळे वारंवार चाहते  #Banlipstic हॅशटॅग नेमकं काय आहे असे प्रश्न विचारत होते. तर काहींना हा प्रमोशनचा भाग असावा याचा अंदाज आला होता. अगदी तसेच झाले #Banlipstic हॅशटॅगचा वापर करत वेबसिरीजचे हटके प्रमोशन करण्यात येत होते. 

 

संजय जाधव (Sanjay Jadhav) यांची नवी वेबसीरिज 'अनुराधा' रसिकांच्या भेटीला येत आहे. याच वेबसीरिजचे हटके प्रमोशन करण्यात येत होते. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. त्यानंतर वेबसिरीची घोषणा करण्यात आली. 'अनुराधा' (Anuradha Webseries) या वेबसीरिजचा पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. हटके प्रमोशन करण्यासाठी सोशल मीडियावर #Banlipstic हॅशटॅगचा वापरण्यात आला होता.

आता या वेबसिरीजमध्ये नेमके कोणत्या कलाकारांच्या भूमिका आहेत हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.तुर्तास व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ज्या अभिनेत्री दिसल्या त्यांच्या मुख्य भूमिका असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हिंदी प्रमाणे मराठीतही सिनेमा असो किंवा वेबसिरीज प्रमोशनचा फंडाही बदलला आहे.त्याबरोबर गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी वेबसिरीजही प्रचंड हिट ठरल्या.  त्यामुळे आता वेबसिरीजचे हटके प्रमोशन करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हटके प्रमोशन फंडाही दिवसेंदिवस हिट होत आहे. 'अनुराधा' या वेबसिरीजचे होणारे हटके प्रमोशन पाहून सोशल मीडियावर कौतुकही होत आहे. पोस्टर समोर आल्यापासून वेबसिरीज पाहण्यासाठी चाहत्यांमध्येही कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. 

Web Title: Creators of Anuradha Webseries finds a unique way of promoting their webseries, check why Ban Lipstick in trending on Social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.