​ Exclusive लग्न मुबारकमध्ये संस्कृती-प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2016 04:02 PM2016-12-04T16:02:05+5:302016-12-04T16:14:27+5:30

       priyanka londhe दोन नायिका आता सर्रास चित्रपटांमध्ये आपल्याला एकत्र पाहायला मिळतात. पूर्वी दोन अभिनेत्री एकाच चित्रपटात ...

Culture-praying in exquisite wedding greetings | ​ Exclusive लग्न मुबारकमध्ये संस्कृती-प्रार्थना

​ Exclusive लग्न मुबारकमध्ये संस्कृती-प्रार्थना

googlenewsNext
       priyanka londhe


दोन नायिका आता सर्रास चित्रपटांमध्ये आपल्याला एकत्र पाहायला मिळतात. पूर्वी दोन अभिनेत्री एकाच चित्रपटात दिसल्या की लगेचच सगळ््यांच्या भूवया उंचावायच्या आणि त्या दोघींच्या अभिनयापेक्षा त्यांच्या कॅट फाईट विषयीच जास्त चर्चा व्हायच्या. आता हे चित्र पूर्णपणे बदललेले असून दोन अभिनेत्री एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी असल्याचे आपण मराठी चित्रपटसृष्टीत पाहीलेच आहे. अशाच दोन अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि प्रार्थना बेहेरे प्रथमच एकमेकींसमोर येणार आहेत. लग्न मुबारक या चित्रपटाच्या निमित्ताने या दोघीही आता स्क्रिन शेअर करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. सिद्धांत मुळ््ये या नवोदित अभिनेत्या सोबत या दोघीही रोमान्स करताना प्रेक्षकांना दिसणार आहेत. होय, कारण या चित्रपटात आपल्याला पे्रमाचा त्रिकोण म्हणजेच लव्ह ट्रँगल पहायला मिळणार आहे. या चित्रपटातील भूमिके संदर्भात अभिनेत्री संस्कृती बालगुडेने लोकमत सीएनएक्सशी संवाद सधताना अनेक गोष्टींचा उलगडा केला. संस्कृती सांगते. मी आणि प्रार्थना आम्ही दोघी एकमेकींना बºयाच दिवसांपासून ओळखतो. परंतू कधी एकत्र काम केले नव्हते. या चित्रपटाच्या निमित्ताने आता आम्ही पहिल्यांदाच एकमेकीं समोर उभे राहणार आहोत. तसेच सिदधांत सोबत मी याआधी काम केले आहे. अभिनेता म्हणून त्याचा हा पहिलाच चित्रपट असला तरी आमची ट्युनिंग अतिशय छान आहे. तो माझा चांगाल मित्र आहे. एक हीरो म्हणुन प्रेक्षकांना तो नक्कीच आवडेल, कारण तो फारच गुडलुकींग आणि मेंटेन्ड आहे. लवकरच मी या चित्रपटच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असून या सिनेमासाठी फारच उत्सुक असल्याचे संस्कृतीने सांगितले.

Web Title: Culture-praying in exquisite wedding greetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.