मराठीतील ही बालकलाकार आता दिसते फारच सुंदर; जाणून घ्या, ती सध्या काय करते?  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 04:23 PM2022-02-02T16:23:21+5:302022-02-02T16:30:07+5:30

2016 साली प्रदर्शित ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ (Damlelya Babachi Kahani ) हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. बापलेकीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या या सिनेमात संदीप खरे आणि दीप्ती भागवत मुख्य भूमिकेत होते. शिवाय एक बालकलाकारही होती.

damlelya babachi kahani fame child actress shreya pasalkar then and now | मराठीतील ही बालकलाकार आता दिसते फारच सुंदर; जाणून घ्या, ती सध्या काय करते?  

मराठीतील ही बालकलाकार आता दिसते फारच सुंदर; जाणून घ्या, ती सध्या काय करते?  

googlenewsNext

2016 साली प्रदर्शित ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ (Damlelya Babachi Kahani ) हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. बापलेकीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या या सिनेमात संदीप खरे आणि दीप्ती भागवत मुख्य भूमिकेत होते. शिवाय एक बालकलाकारही होती. श्रेया पासलकर (Shreya Pasalkar) तिचं नाव.
 संदीप खरे, दीप्ती भागवत यांच्यासोबत बालकलाकार श्रेया पासलकरच्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली होती. ही चिमुकली सध्या काय करते? कुठे आहे? तर मालिका आणि चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतेय.

सध्या ‘आई मायेचं कवच’ या कलर्स मराठीवरील मालिकेत ती श्वेताची भूमिका साकारते आहे.  सुहानीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती आहे.  काळानुसार तिच्या लूकमध्येही प्रचंड बदल झाला आहे. श्रेया पासलकर ही पुण्यातच लहानाची मोठी झाली. तिची आई पल्लवी पासलकर राजकारणाशी निगडित आहे. तर वडील शिवा पासलकर हे मोठे व्यावसायिक आहेत.

 लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या श्रेयाला ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ या या चित्रपटामुळे अमाप प्रसिद्धी मिळाली होती.
 चिक्की या शॉर्ट फिल्ममध्ये ती मुख्य भूमिकेत झळकली होती. या शॉर्टफिल्ममधील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. अभिनयासोबतच श्रेयाला गाण्याची देखील आवड आहे. वाघे-या, गेट टूगेदर, खिचिक, अ‍ॅटमगिरी, बाबो अशा मराठी चित्रपटासोबतच श्रेयाने भंवर या हिंदी चित्रपटात देखील काम केलं आहे. खुर्ची या आगामी मराठीत चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात  अभिनेता अक्षय वाघमारे महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.  

Web Title: damlelya babachi kahani fame child actress shreya pasalkar then and now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.