लेक झाली Pilot!, अभिनेता शरद पोक्षेंसाठी अभिमानाचा क्षण, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 07:00 PM2022-11-17T19:00:49+5:302022-11-17T19:01:22+5:30

Sharad Ponkshe :शरद पोंक्षे यांच्या लाडक्या लेकीने पायलट होण्याचं स्वप्न पूर्ण केले आहे.

daughter became Pilot..., a proud moment for actor Sharad Ponkshe, said.. | लेक झाली Pilot!, अभिनेता शरद पोक्षेंसाठी अभिमानाचा क्षण, म्हणाले...

लेक झाली Pilot!, अभिनेता शरद पोक्षेंसाठी अभिमानाचा क्षण, म्हणाले...

googlenewsNext

आपल्या मुलांनी आपल्यासारखचं किंवा त्याही पेक्षा कित्येक पटीने जास्त नाव कमवावं असं प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं. परंतु आईवडीलांच्या प्रचंड प्रसिद्धी वलयाच्या बाहेर पाय ठेऊन वेगळी वाट निवडणं हे प्रत्येकाला जमेलच असं नाही. आपल्या प्रमाणेच आपल्या मुलांचही नाव मोठं व्हावं, पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटावा हे प्रत्येक पालकांना वाटतंच असंत. अशी अभिमानास्पद गोष्ट एका अभिनेत्यासोबतही घडली आहे. आणि हे अभिनेते म्हणजे शरद पोंक्षे(Sharad Ponkshe). शरद सध्या त्यांच्या आयुष्यातील अत्यंत अभिमानचा क्षण अनुभवतायेत. कारण  शरद यांच्या लेकीने त्यांचं स्वप्न पूर्ण केले आहे. 

शरद पोंक्षे यांच्या लाडक्या लेकीने पायलट होण्याचं स्वप्न पूर्ण केले आहे. शरद यांनी सोशल मीडियावर लेकीसोबतचे फोटो शेअर करत ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे. फेसबुकवर पोस्ट शेअर करत त्यांनी ‘सिद्धी शरद पोंक्षे आज प्रायव्हेट पायलट झाली.असंख्य अडचणीतून मार्ग काढत ती इथपर्यंत पोहोचली. अभिनंदन सिद्धी,’ अशी भावूक पोस्ट त्यांनी लिहिली आहे. 


जुलै महिन्यात त्यांनी सिद्धीला मुंबई विमानतळावर निरोप देतानाचा फोटो पोस्ट केला होता. ‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’ असं लिहित त्यांनी सिद्धीसोबतचा फोटो पोस्ट केला होता. आता मात्र लेक  पायटल झाल्यानंतर सध्या शरद अभिमानाचा क्षण अनुभवत आहेत.


शरद पोंक्षे यांना स्नेह आणि सिद्धी अशी दोन मुलं आहेत. वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत स्नेहने नुकतेच चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. तर सिद्धी आता प्रायव्हेट पायलट बनली आहे.
 

Web Title: daughter became Pilot..., a proud moment for actor Sharad Ponkshe, said..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.