'दे धक्का'मधील 'उगवली शुक्राची चांदणी'वर थिरकलेली बालकलाकार आठवतेय का? आज आहे सिनेइंडस्ट्रीतून गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 07:00 AM2022-02-27T07:00:00+5:302022-02-27T07:00:00+5:30

‘दे धक्का’मधील ‘उगवली शुक्राची चांदणी’ गाण्यात थिरकणारी बालकलाकार आता मोठी झाली असून आता तिला ओळखणं कठीण झालं आहे.

'De Dhakka' starring 'Ugavali Shukrachi Chandani' disappears from Cineindustry | 'दे धक्का'मधील 'उगवली शुक्राची चांदणी'वर थिरकलेली बालकलाकार आठवतेय का? आज आहे सिनेइंडस्ट्रीतून गायब

'दे धक्का'मधील 'उगवली शुक्राची चांदणी'वर थिरकलेली बालकलाकार आठवतेय का? आज आहे सिनेइंडस्ट्रीतून गायब

googlenewsNext

२००८ साली रिलीज झालेला चित्रपट 'दे धक्का' (De Dhakka Movie) सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि चित्रपटातील कलाकारांना तसंच त्यांच्या भूमिकांना रसिकांनी डोक्यावर घेतले होते. सिद्धार्थ जाधवचा अतरंगी अंदाज आणि मकरंद अनासपुरेचा गावरान बाज प्रेक्षकांना खूपच भावला. तसेच शिवाजी साटम, मेधा मांजरेकर यांच्याही या चित्रपटात भूमिका होत्या. 'दे धक्का' या चित्रपटातील दोन बालकलाकरांनी रसिकांची मनं जिंकली होती. हे बालकलाकार म्हणजे सक्षम कुलकर्णी (Saksham Kulkarni) आणि गौरी वैद्य (Gauri Vaidya) . मात्र आता हे बालकलाकार चांगलेच मोठे झालेत आणि त्यामुळे त्यांचा लूकही. गौरीने दे धक्का चित्रपटात सायलीची भूमिका साकारली होती.

‘दे धक्का’ चित्रपटाची कथा जिच्या डान्स स्पर्धेभोवती फिरत होती ती भूमिका गौरीने साकारली. तिच्यावर चित्रीत झालेले उगवली शुक्राची चांदणी हे गाणे हिट ठरले होते. या चित्रपटातील याच गाण्यामुळे गौरीला नवी ओळख आणि खूप लोकप्रियता मिळाली. मात्र आता गौरीला पाहून तुम्ही तिला ओळखणारही नाही.

गौरी आता २६ वर्षांची झाली आहे. तिने मुंबईत माटुंगा इथल्या ‘डी. जी. रुपारेल’ महाविद्यालयामधून शिक्षण घेतल्यानंतर इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी’मधून पदवी घेतलीय. ‘दे ध’क्का’ चित्रपटानंतर गौरीने ‘शिक्षणाचा आयचो घो’ या चित्रपटातही सक्षमच्या बहिणीची भूमिका साकारली. २०११ मध्ये ‘एकापेक्षा एक जोडीचा मामला’ ह्या रियालिटी शोमध्ये तिने सक्षमसोबत सहभाग घेतला होता.

२०१५ साली तिने आवाहन चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट २००७ साली आलेल्या तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. यात तिने रूपा नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. तिच्यासोबत सचिन खेडेकर, मनोज जोशी, कश्मीरा शाह, अमृता खानविलकर, सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानंतर आता ती सिनेइंडस्ट्रीतून गायब झाली आहे.

Web Title: 'De Dhakka' starring 'Ugavali Shukrachi Chandani' disappears from Cineindustry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.