२ दिवस फ्लॅटमध्ये पडून असलेला मृतदेह, अस्ताव्यस्त बेड; रवींद्र महाजनींचा शेवटचा फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 12:36 PM2023-07-15T12:36:47+5:302023-07-15T12:37:12+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम हंक अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे निधन झाले. पुण्यातील तळेगाव आंबी एमआयडीसी येथील त्यांच्या घरात त्यांचा मृतदेह आढळला.

Dead body lying in flat for 2 days, uncomfortable bed; Ravindra Mahajani's last photo came out | २ दिवस फ्लॅटमध्ये पडून असलेला मृतदेह, अस्ताव्यस्त बेड; रवींद्र महाजनींचा शेवटचा फोटो आला समोर

२ दिवस फ्लॅटमध्ये पडून असलेला मृतदेह, अस्ताव्यस्त बेड; रवींद्र महाजनींचा शेवटचा फोटो आला समोर

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम हंक अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे निधन झाले. पुण्यातील तळेगाव आंबी एमआयडीसी येथील त्यांच्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. शवविच्छेदनानंतर रवींद्र महाजनी यांचा मृतदेह ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा सून आणि नातू आहे. दरम्यान आता त्यांच्या घरातील त्यांचा शेवटचा फोटो समोर आला आहे.

रवींद्र महाजनी यांचा शेवटचा फोटो समोर आला आहे. त्यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. दोन दिवसांपासून मृतदेह पडून असल्यामुळे शरीर, चेहरा काळा पडला होता. त्यांनी पिवळ्या रंगाचं टी-शर्ट घातले होते. त्यांच्या मृतदेहा शेजारी WHEY नावाच्या प्रोटीनचा डब्बा दिसत आहे. रविंद्र महाजनी बेडच्या खाली, डोक्यावर पडले आहेत. याशिवाय शेजारी काळ्या रंगाचं ऑइलही दिसत आहे. नेमके त्यांच्या शेजारी असलेल्या काळ्या रंगाचं द्रव्य काय आहे हे समजू शकलेले नाही. 

रविंद्र महाजनी पुण्यातील तळेगाव दाभाडे भागात मागील ८-९ महिन्यांपासून भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी घराचा दरवाजा उघडला नव्हता. घरातून उग्र वास येऊ लागल्याने दार उघडण्यात आले तेव्हा ते मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रविंद्र महाजनी यांना घेऊन दवाखान्यात दाखल केले तेव्हा ते मृत असल्याचे घोषित करण्यात आले. 

वर्कफ्रंट...

‘देवता’, ‘आराम हराम आहे’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘बेलभंडार’ अशा सुपरहिट सिनेमांत काम करुन रवींद्र महाजनी यांनी ७० ते ९०चा काळ गाजवला. त्यांच्या मुलगा गश्मीर महाजनीही लोकप्रिय अभिनेता आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या सिनेमात रवींद्र महाजनी आणि गश्मीर महाजनी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटातून या बाप लेकाची जोडी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाली होती. त्याचप्रमाणे देऊळ बंद या मराठी सिनेमातही त्या दोघांनी एकत्र काम केले होते.

Web Title: Dead body lying in flat for 2 days, uncomfortable bed; Ravindra Mahajani's last photo came out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.