Death Anniversary : ‘लक्ष्या’ने लावले होते सगळ्यांनाच वेड! ढसाढसा रडला होता सलमान खान!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 12:36 PM2018-12-16T12:36:19+5:302018-12-16T12:36:57+5:30

केवळ कॉमेडीच नाही तर प्रत्येक भूमिकेला जीव ओतून न्याय देणारा अभिनेता म्हणजे सा-यांचा लाडका ‘लक्ष्या’ अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे. आज (१६ डिसेंबर)लक्ष्मीकांत बेर्डे याचा स्मृतीदिन. १६ डिसेंबर २००४ रोजी लक्ष्मीकांत यांनी जगाचा निरोप घेतला.

Death Anniversary: laxmikant berde death anniversary | Death Anniversary : ‘लक्ष्या’ने लावले होते सगळ्यांनाच वेड! ढसाढसा रडला होता सलमान खान!!

Death Anniversary : ‘लक्ष्या’ने लावले होते सगळ्यांनाच वेड! ढसाढसा रडला होता सलमान खान!!

googlenewsNext
ठळक मुद्देलक्ष्मीकांत यांनी ‘अभिनय आर्ट्स’ नावाचे प्रॉडक्शन हाऊसही सुरू केले.  लक्ष्मीकांत बेर्डे उत्कृष्ट गिटारवादक होते, हे फार कमी जणांना ठाऊक आहे.

रसिकांना त्याने खळखळून हसवले ,रसिकांना सारे दु:ख विसरायला लावले आणि मनमुराद मनोरंजन केले. मराठी असो किंवा हिंदी सिनेमा,त्याच्या कॉमेडीच्या भन्नाट आणि अचूक टायमिंगने रसिकांना अक्षरश: वेड लावले. केवळ कॉमेडीच नाही तर प्रत्येक भूमिकेला जीव ओतून न्याय देणारा अभिनेता म्हणजे सा-यांचा लाडका ‘लक्ष्या’ अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे. आज (१६ डिसेंबर)लक्ष्मीकांत बेर्डे याचा स्मृतीदिन. १६ डिसेंबर २००४ रोजी लक्ष्मीकांत यांनी जगाचा निरोप घेतला.
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सिनेमाच्या या रंगीत दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर मराठी सिनेमाच नाहीतर नाटक आणि हिंदी सिनेमातूनही स्वत:चा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या.  

१९८९ मध्ये ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून लक्ष्मीकांत यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. या चित्रपटात सलमान खान लीड रोलमध्ये होता. यानंतर लक्ष्मीकांत यांनी सलमानच्या अनेक चित्रपटात काम केले. भलेही त्यांनी नोकराची भूमिका साकारली. पण आपल्या शानदार अभिनयामुळे ते नोकर नाही तर त्या चित्रपटाचे हिरो ठरले. सलमानसोबत लक्ष्मीकांत यांचे खूप चांगले बॉन्डिंग होते. त्यामुळेच लक्ष्मीकांत गेले, त्यादिवशी सलमान अगदी ढसाढसा रडला होता.


 लक्ष्मीकांत यांनी रूही बेर्डेसोबत पहिले लग्न केले. पण हा संसार फार काळ टिकला नाही. मतभेदानंतर दोघेही घटस्फोट न घेताच विभक्त राहू लागले. यानंतर लक्ष्मीकांत यांनी प्रिया अरूण यांना डेट केले व त्यांच्यासोबत राहू लागले. लग्न त्यांनी बºयाच दिवस जगापासून लपवून ठेवले.
लक्ष्मीकांत बेर्डे व प्रिया बेर्डे  या जोडीने अनेक मराठी चित्रपटात एकत्र काम केले होते. तसेच हिंदी चित्रपटातसुद्धा हे दोघे एकत्र झळकले होते. अभिनय आणि स्वानंदी ही प्रिया-लक्ष्मीकांत यांच्या मुलांची नावे आहेत. अभिनयने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे. तर धाकटी मुलगी स्वानंदीचे महाविद्यालयीन शिक्षण सुरु आहे.

लक्ष्मीकांत यांनी ‘अभिनय आर्ट्स’ नावाचे प्रॉडक्शन हाऊसही सुरू केले.  लक्ष्मीकांत बेर्डे उत्कृष्ट गिटारवादक होते, हे फार कमी जणांना ठाऊक आहे. लक्ष्मीकांत बेर्डे शिस्तप्रिय होते. रात्री कितीही उशीरा झोपले, तरी सकाळी वेळेत ते सेटवर हजर असायचे.  लक्ष्मीकांत यांचा शॉट आहे म्हटल्यावर त्यांच्या हिरोईन्ससुद्धा वेळेत सेटवर हजर असायच्या. ‘एक होता विदुषक’च्या अपयशामुळे लक्ष्मीकांत खचून गेले होते. त्या चित्रपटाच्या अपयशाच्या दु:खातून ते शेवटपर्यंत बाहेर पडू शकले नाहीत, असे प्रिया यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
 
 
 

Web Title: Death Anniversary: laxmikant berde death anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.