मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय 'हा' सिक्स पॅक्सवाला रांगडा हिरो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 08:26 AM2018-05-29T08:26:43+5:302018-05-29T13:56:43+5:30

बॉलिवूडमध्ये सलमान खान, अक्षय कुमार, हृतिक रोशन ते अगदी टायगर श्रॉफपर्यंत अनेक सिक्स पॅक्स असलेले हिरो आहेत. पण आता ...

'This' is a debut for Marathi cinema | मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय 'हा' सिक्स पॅक्सवाला रांगडा हिरो

मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय 'हा' सिक्स पॅक्सवाला रांगडा हिरो

googlenewsNext
लिवूडमध्ये सलमान खान, अक्षय कुमार, हृतिक रोशन ते अगदी टायगर श्रॉफपर्यंत अनेक सिक्स पॅक्स असलेले हिरो आहेत. पण आता मराठीतही सहा फुट उंच आणि सिक्सपॅक एब्ज असलेला हिरो डेब्यु करतो आहे. ह्या हँडसम हंकचे नाव आहे, जीत.

जीत लवकरच फ्युचर एक्स प्रॉडक्शन्स आणि जे सेव्हन प्रोडक्शन्सच्या ‘फाइट’ ह्या मराठी एक्शनपटातून फिल्म इंडस्ट्रीत डेब्यु करत आहे. फाइट सिनेमाचा दिग्दर्शक जीमी मोरे सांगतो, “बॉलिवूडमध्ये सिक्स पॅक एब्ज असणारे हिरो आहेत. त्यामुळे तिथे एक्शनपटही बनतात. मराठीत असलेल्या हिरोंचा बांधा पाहता, असे सिनेमे मराठीत येऊ शकत नाहीत. त्यामुळेच स्वप्नील महालिंगने लिहिलेली ही फाइट चित्रपट दिग्दर्शित करायचे मी ठरवले तेव्हा मला अशा हिरोचा शोध होता. जो चांगलाच उंच असेल आणि त्याची बिल्टही चांगली असेल.”

जीतविषयी सांगताना जीमी मोरे म्हणतात, “जीतचा रस्टिक लुक त्याचप्रमाणे त्याची पिळदार देहयष्टी हा सिनेमाचा महत्वाचा भाग आहे. ह्या सिनेमातल्या फाइट्सही त्याच्या रांगड्या व्यक्तिमत्वामूळे वास्तववादी वाटतील.” फाइट चित्रपटाचे चित्रीकरण सध्या वाई आणि पुण्यात होत असून सिनेमा ह्यावर्षी रिलीज करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे.

जीतला त्याच्या सिनेमाविषयी आणि भूमिकेविषयी विचारल्यावर तो म्हणतो, “माझ्या सिनेमातल्या भूमिकेला पूर्ण न्याय देण्यासाठी मी गेले तीन महिने त्यातल्या विविध पैलूंवर मेहनत घेतोय. अभिनय आणि एक्शन ह्यांचा सुरेख मिलाफ तुम्हाला माझ्या रोल मधून पाहता येणार आहे. माझा विश्वास आहे, की हा चित्रपट रसिकांना नक्कीच आवडेल.”

Web Title: 'This' is a debut for Marathi cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.