'लकी'मधून नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 11:11 IST2019-02-02T10:37:23+5:302019-02-02T11:11:38+5:30

आजपर्यंत प्रायोगिक सिनेमात दिसलेला पुण्याचा अभिनेता अभय महाजन पहिल्यांदाच ‘लकी’मधून व्यावसायिक सिनेमात दिसणार आहे.

Deepti sati and abhay mahajan lead roll in lucky movie | 'लकी'मधून नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला

'लकी'मधून नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला

ठळक मुद्देचित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला प्रदर्शित होतोय

बी लाइव्ह प्रस्तूत ‘लकी’ सिनेमाच्या स्टारकास्टने नुकतीच पूण्यात लोकमत ऑफिसला भेट घेतली. लकी सिनेमाचे निर्माते सुरज सिंग, दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेता अभय महाजन, अभिनेत्री दिप्ती सती आणि गायक चैतन्य देवढे ह्यांनी पुण्यातल्या लोकमतच्या पत्रकारांशी संवाद साधला.

दुनियादारी, तू हि रे, प्यारवाली लव्हस्टोरी, गुरू, येरेयेरे पैसा अशा सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केलेले फिल्ममेकर संजय जाधव म्हणाले, “लोकमतशी संवाद साधायला मला खूप आवडतं. सिनेमाचे जाणकार इथे आहेत. माझ्या प्रत्येक सिनेमाच्यावेळी लोकमत ने नेहमीच साथ दिली . पूण्यात सिनेमाचा प्रिमियर करणे हा माझा रिवाज असतो. लकी सिनेमा पुणेकरांना खूप आवडेल. ह्याची मला पूर्ण खात्री आहे.”  

एम एस धोनी आणि फ्लाइंग जाट सारख्या हिट सिनेमाची निर्मिती करणारे बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे सुरज सिंग 'लकी' सिनेमाव्दारे मराठी सिनेसृष्टीत निर्माते म्हणून पाऊल ठेवत आहे. बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे संचालक आणि लकी सिनेमाचे निर्माते सुरज सिंग म्हणाले, “पुणेकरांना सिनेमा आवडला की तो अख्या महाराष्ट्राला आवडतो, असं म्हटलं जातं. आणि पूणेकरांनी नेहमीच संजयदादांच्या सिनेमावर भरभरून प्रेम केलंय. त्यामूळे पुणेकरांपर्यंत सिनेमा पोहोचवायला आम्ही आलो आहोत. लकीमधून तुम्ही 2019मधली कॉलेज युवकांची धमाल मजेदार कथा अनुभवाल. आणि ती तुम्हाला खूप आवडेल असा मला विश्वास आहे.”

आजपर्यंत प्रायोगिक सिनेमात दिसलेला पुण्याचा अभिनेता अभय महाजन पहिल्यांदाच ‘लकी’मधून  व्यावसायिक सिनेमात दिसणार आहे. अभय महाजन लकीबद्दल म्हणतो, “प्रत्येक अभिनेत्याला आपणही लार्जर दॅन लाइफ सिनेमाचा हिरो व्हावं, असं वाटतं. सिनेमात आपली हिरोसारखी लक्षवेधी एन्ट्री व्हावी. आपण पोस्टरवर असावे, ह्या माझ्या सर्व इच्छा लकीमुळे पूर्ण झाल्या. आणि संजयदादांच्या सिनेमाचा भाग होणं ही खूप भारी गोष्ट आहे. त्यामुळे मी स्वत:ला अतिशय लकी समजतो, की मी ह्या सिनेमाचा हिस्सा आहे.”

लकीमधून अभिनेत्री दिप्ती सती मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. दिप्ती म्हणाली, “मी आजवर संजयदादांचे सिनेमे पाहिले होते. पण एक दिवस त्यांच्या सिनेमाची हिरोइन बनून मी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करेन असं मला कधी वाटलं नव्हतं. तसेच मॉडेलिंगच्या निमित्ताने पुण्यात नेहमी येणा-या माझी आज पुण्यात होर्डिंगस लागलेली पाहणे, खरंच स्वप्नवत आहे. मी खरंच खूपच लकी आहे, की मी संजयदादांच्या सिनेमाचा हिस्सा आहे.”

चैतन्य देवढे याने सुरेल आवाजात चित्रपटातील गाणे गाऊन सर्वांकडून कौतुकाची थाप मिळविली.  'बी लाइव्ह प्रोडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.
 

Web Title: Deepti sati and abhay mahajan lead roll in lucky movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.