सरोगसीवर भाष्य करणार 'डिलिव्हरी बॉय', प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप मुख्य भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 06:57 PM2024-01-09T18:57:16+5:302024-01-09T18:58:39+5:30
Delivery Boy Movie : 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट सरोगसीवर भाष्य करतो. यात प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप सोबत अंकिता लांडे मुख्य भूमिकेत आहे.
'डिलिव्हरी बॉय' (Delivery Boy Movie) या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. त्यात काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे एक पोस्टर सोशल मीडियावर पाहायला मिळाले.या चित्रपटात प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप सोबत अंकिता लांडे मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट सरोगसीवर भाष्य करतो. हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
'डिलिव्हरी बॉय'मधून प्रथमेश परब एका वेगळ्याच लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार असून त्याचा हा नवा अंदाज चाहत्यांना नक्कीच आवडेल. हा चित्रपट सरोगसीवर भाष्य करणारा आहे, हे टीझरवरून कळतच आहे. आता हा नाद खुळा भाऊ आणि त्याचा जोडीदार गावातील महिलांना सरोगसीसाठी तयार करतो की आणखी अडचणी मागे लावून घेतो, हे बघताना प्रेक्षकांना धमाल येणार आहे. सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स निर्मित 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. मोहसीन खान दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे.
याबद्दल दिग्दर्शक मोहसीन खान म्हणाले की," एका संवेदनशील विषयवर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. चित्रपट विनोदी जरी असला तरी या नाजूक विषयांचे गांभीर्य आम्ही तितकेच जपले आहे. विनोदाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही नात्यांची गोष्ट आहे. जी प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत पाहावी अशी आहे. आपल्या समाजात हा विषय तितकासा उघडपणे, सहजपणे बोलला जात नाही. त्यामुळे हा विषय घराघरात पोहोचावा, त्याचे महत्व पटावे, याकरता आम्ही हा चित्रपट अगदी मनोरंजनात्मकरित्या प्रेक्षकांसाठी आणला आहे.''