"सामर्थ्य असूनही...", 'सुभेदार' फेम अजय पूरकरांनी सांगितली 'मर्दांनगी'ची व्याख्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:04 IST2025-03-19T13:03:55+5:302025-03-19T13:04:19+5:30
Ajay Purkar : अजय पूरकर यांनी एका मुलाखतीत खरी मर्दांनगी काय असते, यावर आपलं मत मांडलं आहे.

"सामर्थ्य असूनही...", 'सुभेदार' फेम अजय पूरकरांनी सांगितली 'मर्दांनगी'ची व्याख्या
अजय पूरकर (Ajay Purkar) मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी सुभेदार, पावनखिंड,शिवरायांचा छावा, फत्तेशिकस्त, फर्जंद, अशा अनेक सिनेमांमधून रसिकांच्या मनावर आपली छाप उमटविली आहे. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत खरी मर्दांनगी काय असते, यावर आपलं मत मांडलं आहे.
अजय पूरकर यांनी सामर्थ्य असूनही डोकं शांत ठेवणे, हीच मर्दांनगी असल्याचं म्हटलं आहे. नुकतेच त्यांनी आरपार ऑनलाइन या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले की, ''मी बघितलंय लहानपणापासून की जे खूप धिप्पाड आणि पैलवानकी करणारे वगैरे असे असतात ना हे खूप साधे आणि शांत असतात. नम्र नाही शांत असतात. कारण त्यांना माहिती असते की जर ते चिडले तर काय होऊ शकते. ही मला वाटतं ही मर्दांनगी आहे. कळलं का?''
''जेवढे कोणी गुंड आहेत त्यात...''
ते पुढे म्हणाले की, ''जेवढे कोणी गुंड आहेत त्यात बॉडीबिल्डर आहेत का, कारण दहशतीचा शरिरयष्टीशी काहीच संबंध नसतो. त्यासाठी धाडस लागते. मी ह्याला चाकू मारेन आता त्या काळचे हत्यारे तीच होती ना. मी ह्याला चाकू मारेन ही डेरिंग लागते. याचा तुमच्या बायसेप्स किती मोठा आहे, ह्याच्याशी संबंध नसतो. याच्याशी काही देणं घेणं नसते. त्याला माहित असतं की जर ह्याला मी मारलं तर त्याचं काय होईल त्यामुळे ते सगळे शांत असतात. त्यांचं इथून कधी हालत नाही. कारण की त्यांना हे नक्की माहिती असतं की याला एक जरी मारला तरी हा उठणार नाही. आणि त्यामुळे मुळात प्रॉब्लेम त्याला नाही मला आहे. कारण की गुन्हा माझ्याकडून घडणार आहे. म्हणून ते गप्प असतात आणि म्हणून मी म्हणतो की ही मर्दांनगी आहे. मला काही दाखवायची गरज नाही.''