साधनाने गायली १५ हजार गाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2016 06:21 PM2016-12-01T18:21:05+5:302016-12-01T18:21:05+5:30
साधना सरगम हे नाव बॉलिवूडच काय तर प्रत्येक संगीतप्रेमीच्या मनात कायमचे घर करुन आहे. नव्वदच्या दशकातील अनेक सुपरहिट गाणी ...
स धना सरगम हे नाव बॉलिवूडच काय तर प्रत्येक संगीतप्रेमीच्या मनात कायमचे घर करुन आहे. नव्वदच्या दशकातील अनेक सुपरहिट गाणी साधना सरगम यांच्या नावावर आहेत. मेलडि साँग गाण्यासाठी प्रसिदध असलेल्या साधना सरगम यांनी अनेक प्रकारची गाणी चित्रपटसृष्टीला दिली आहेत. एक नाही दोन नाही तर त्यांनी तब्बल चौतीस भाषांमध्ये गाणी गायली आहेत. दाभोळच्या या मराठमोळ््या मुलीने आज बॉलिवूडमध्ये आपल्या मधूर आवाजाने स्वत:ची स्वतंत्र ओळख आणि जागा निर्माण केली आहे. सातसमंदर पार मैं तेरे पीछे पीछे गई या गीताने ९० च्या दशकात धूम केली. हे गीत गाणाºया साधना घाणेकर अर्थात साधना सरगम यांच्या अनेक गाण्यांनी लाखो चाहते घायाळ आहेत.हर किसी को नहीं मिलता, मैं तेरी मोहोब्बत में, तेरी उम्मीद तेरा इंतजारआणि नीले नीले अंबर पर ही त्यांची गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. कल्याणजी-आनंदजी जोडीपासून ए. आर. रहेमानपर्यंत प्रत्येकाने त्यांचे कौतुक केले. उदित नारायण यांच्यासोबत 'जो जीता वही सिकंदर' या सिनेमातील गाजलेले गाणे पहला नशा पहला खुमार गाऊन प्रसिद्धीझोतात आलेल्या साधना सरगम यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वषार्पासून गायन सुरु केले होते. वयाच्या चौथ्या वर्षी साधना यांनी सवाई गंधर्व म्युझिक फेस्टिव्हलमध्ये गाणे सादर केले होते. चार दशकाच्या करिअरमध्ये गोड गळ्याच्या साधना यांनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत तिने १५ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.