'चौकातलं कपल' ! किरण गायकवाडने शेअर केला 'या' अभिनेत्रीसोबत रोमॅण्टिक फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 17:29 IST2023-05-28T17:29:19+5:302023-05-28T17:29:53+5:30
Kiran gaikwad: किरणच्या फोटोची होतीये नेटकऱ्यांमध्ये चर्चा

'चौकातलं कपल' ! किरण गायकवाडने शेअर केला 'या' अभिनेत्रीसोबत रोमॅण्टिक फोटो
गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाविश्वात चौक या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून छोट्या पडद्यावरील 'देवमाणूस' अर्थात अभिनेता किरण गायकवाड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या सिनेमाशी संबंधित अनेक पोस्ट तो चाहत्यांसोबत शेअर करत आहे. यात अलिकडेच त्याने अभिनेत्री संस्कृती बालगुडेसोबत एक रोमॅण्टिक फोटो शेअर केला आहे.
'चौक' या सिनेमात किरणसोबत संस्कृतीदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे या सिनेमातील एक फोटो किरणने शेअर केला आहे. सोबतच चौकातलं” कपल येतय “चौकात” २ जुनला, असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे त्यांच्या या फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
दरम्यान, अनुराधा प्रोडक्शनचा हा सिनेमा २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री संस्कृती बालगुडे स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती दिलीप लालासाहेब पाटील यांनी केली आहे. तर,कथा, पटकथा , संवाद आणि दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांचं आहे.