"यातनेच्या वादळात तुझी लाभते साथ"; 'देवमाणूस' सिनेमातील 'पांडुरंगा' गाण्याची चर्चा, सोनू निगमचा आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 13:30 IST2025-04-03T13:29:19+5:302025-04-03T13:30:13+5:30

महेश मांजरेकर यांच्या आगामी देवमाणूस सिनेमातील पांडुरंगा गाण्याची चर्चा. बातमीवर क्लिक करुन नक्की ऐका

devmanus movie song panduranga by sonu nigam mahesh manjrekar renuka shahane | "यातनेच्या वादळात तुझी लाभते साथ"; 'देवमाणूस' सिनेमातील 'पांडुरंगा' गाण्याची चर्चा, सोनू निगमचा आवाज

"यातनेच्या वादळात तुझी लाभते साथ"; 'देवमाणूस' सिनेमातील 'पांडुरंगा' गाण्याची चर्चा, सोनू निगमचा आवाज

महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘देवमाणूस’ सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. सिनेमाच्या टीझरपासूनच सिनेमाच्या कथानकाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे. आता या चित्रपटातील पहिले गाणे 'पांडुरंग' प्रेक्षकांच्या भेटीला आहे आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सची निर्मिती असणाऱ्या 'देवमाणूस' चित्रपटातील हे भक्तीगीत संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारे आहे. 

सोनू निगमच्या आवाजाने सजलेलं पांडुरंग

सोनू निगम यांच्या सुमधुर आवाजात गायलेले, रोहन रोहन यांनी संगीतबद्ध केलेले आणि प्रसाद मदपुवार यांनी लिहिलेले 'पांडुरंग' हे गाणे श्रद्धा आणि भक्तीच्या प्रवासाला समर्पित करणारे आहे. महेश मांजरेकर यांची वारी यात्रेतील दृश्ये या गाण्यात पाहायला मिळत असून, ती त्यांच्या भावनिक व आध्यात्मिक प्रवासाचे दर्शन घडवणारी आहेत. 

या गाण्याच्या अनुभवाबद्दल सोनू निगम म्हणतात, ‘’पांडुरंग हे माझे पहिले वारी गाणे आहे आणि या गाण्याचा एक भाग होण्याचा आनंद मला आहे. जेव्हा रोहन-रोहन यांनी स्टुडिओत मला हे गाणे ऐकवले, तेव्हा मी त्याच्या आध्यात्मिक प्रभावाने भारावून गेलो. या गाण्यात भक्तीमय प्रवासाची भावना आणि भगवंत विठ्ठलाच्या भक्तांची अढळ श्रद्धा अतिशय सुंदररित्या साकारली आहे. मी त्यांना सांगितले, मला या गाण्यातील खरी भावना समजावून द्यावी, कारण यात काही पारंपरिक शब्द आहेत, जे माझ्यासाठी नवीन होते. मला खात्री आहे, की माझे हे विठ्ठलाला अर्पण केलेले भावपूर्ण गाणे, जसे मला भावले तसेच ते श्रोत्यांच्या हृदयालाही स्पर्श करेल.”

हे गाणे युनिव्हर्सल म्युझिक इंडियाद्वारे वितरित केले जाणार असून हे गाणे सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.  लव फिल्म्स प्रस्तुत ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले असून, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सर्वांना या आगामी मराठी चित्रपटाची उत्सुकता आहे.

Web Title: devmanus movie song panduranga by sonu nigam mahesh manjrekar renuka shahane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.