"मोबाईलवर आनंद दिघेंचा फोटो अन्..."; मंगेश देसाईंनी सांगितला 'धर्मवीर २'चा खास किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 11:02 AM2024-07-12T11:02:32+5:302024-07-12T11:04:20+5:30
'धर्मवीर २' बद्दल अनेक अडचणी असूनही सिनेमा कसा घडला याचा एक इंटरेस्टिंग किस्सा निर्माते मंगेश देसाईंनी सांगितलाय (dharmaveer 2)
'धर्मवीर २' सिनेमाची सध्या सगळीकडे खूप उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाच्या टीझर, ट्रेलरने प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलंय. महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक 'धर्मवीर २' पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 'धर्मवीर २' सिनेमा निर्मितीमागे अनेक अडचणी होत्या. या अडथळ्यांवर मात करत सिनेमा कसा निर्माण झाला याचा एक इंटरेस्टिंग किस्सा सिनेमाचे निर्माते आणि अभिनेते मंगेश देसाईनी सांगितला आहे.
असा घडला 'धर्मवीर २', मंगेश देसाई म्हणतात...
'धर्मवीर २' चे निर्माते मंगेश देसाई याविषयी म्हणतात, "धर्मवीर" चित्रपटाच्या वेळी माझ्या मोबाईलच्या वॉलपेपरवर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो होता. कालांतराने मी तो बदलला. काही केल्या मनात इच्छा असूनही धर्मवीर २ चित्रपटाच्या गोष्टी या जुळून येत नव्हत्या. शेवटी मी दिघे साहेबांना मनापासून साद घातली आणि धर्मवीर २ चित्रपट करण्याबाबतची इच्छा व्यक्त केली. तुम्हाला खरे वाटणार नाही पण लगेच दुसऱ्या दिवशी सर्व गोष्टी अचानकपणे लगेच जुळून आल्या आणि धर्मवीर २ चित्रपटाच्या कामाला सुरुवात झाली. म्हणजेच आजही दिघे साहेब हे आपल्या आजूबाजूला असल्याची प्रचिती मला मिळाली", असे निर्माते मंगेश देसाई यांनी सांगितले.
'धर्मवीर २' ची कधी रिलीज होणार?
आनंद दिघे यांना 'धर्मवीर' सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर बघितल्यानंतर या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सिनेमा बघून अनेकजण भावुकही झाले. अभिनेता प्रसाद ओकने साकारलेली धर्मवीर आनंद दिघे साहेबांची भूमिका अतिशय उत्कृष्ट रंगली. या सिनेमाला अनेक पुरस्कारही प्राप्त केले. "ज्याप्रमाणे 'धर्मवीर' सिनेमाला रसिकप्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला त्यापेक्षाही 'धर्मवीर २' ला चांगला प्रतिसाद मिळेल याची आम्हाला आशा", असं साहील मोशन आर्ट्सचे निर्माते मंगेश जीवन देसाई आणि झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी सांगितले. येत्या ९ ऑगस्टला 'धर्मवीर २' हा सिनेमा मराठी आणि हिंदी भाषेतून आपल्या भेटीस येणार आहे.