असा हा धर्मवीर! बहुप्रतिक्षित गाणं रिलीज, प्रसिद्ध बॉलिवूड गायकाच्या आवाजात झालं रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 04:50 PM2024-08-26T16:50:19+5:302024-08-26T16:51:02+5:30

धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'धर्मवीर २' या आगामी चित्रपटातील 'असा हा धर्मवीर...' हे गाणं आज रिलीज झालं आहे.

Dharmaveer 2 starring Prasad Oak new song Asa ha dharmaveer out sung by Sukhvinder Singh | असा हा धर्मवीर! बहुप्रतिक्षित गाणं रिलीज, प्रसिद्ध बॉलिवूड गायकाच्या आवाजात झालं रेकॉर्ड

असा हा धर्मवीर! बहुप्रतिक्षित गाणं रिलीज, प्रसिद्ध बॉलिवूड गायकाच्या आवाजात झालं रेकॉर्ड

धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'धर्मवीर २' (Dharmaveer 2) या आगामी चित्रपटातील 'असा हा धर्मवीर...' हे गाणं आज रिलीज झालं आहे. सिनेमाच्या घोषणेपासूनच या गाण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. सुप्रसिद्ध बॉलिवुड गायक सुखविंदर सिंग यांच्या दमदार आवाजात हे गाण रेकॉर्ड करण्यात आले आहे. चाहत्यांनी भरघोस कमेंट करत गाण्याला पसंती दिली आहे.

विश्वजीत जोशी यांनी लिहिलेल्या ह्या गीताला मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अविनाश - विश्वजीत या जोडगोळीने संगीत दिले आहे. सुखविंदर सिंग यांच्या आवाजात गाणं आणखी भारदस्त वाटत आहे. 'धर्मवीर -२' या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स यांनी केली आहे. तर लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. "धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे" या चित्रपटाची गाणी प्रचंड गाजली होती. त्यामुळे "धर्मवीर - २" मधील गाण्यांविषयीही कमालीची उत्सुकता आहे.


सर्वसामान्यांसाठी झटणारे, अन्याय रोखणारे, महिलांना न्याय मिळवून देणारे, धर्मासाठी लढणारे दिघेसाहेब या गाण्यात दिसतात. या गाण्यातून साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडते. त्यामुळे आता चित्रपटात साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली आहे याचे सर्वसामान्य लोकांमध्ये कुतुहल निर्माण झाले आहे. 

धर्मवीर 2 २७ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. प्रसाद ओक, क्षितीज दाते यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. प्रवीण तरडे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

Web Title: Dharmaveer 2 starring Prasad Oak new song Asa ha dharmaveer out sung by Sukhvinder Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.