ती सध्या काय करतेची ही गाणी तुम्ही ऐकली का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2017 03:02 PM2017-01-09T15:02:26+5:302017-01-09T15:02:26+5:30
ती सध्या काय करते या चित्रपटातील हृदयात वाजे समथिंग, परिकथा, कितीदा नव्याने ही गाणी रसिकांच्या पसंतीस उतरत आहेत.
त सध्या काय करते हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पहिल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान, उर्मिला कानेटकर-कोठारे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटामुळे अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकर हे दोन नवे चेहरे मराठी इंडस्ट्रीला मिळालेले आहेत. आर्याने सारेगमप लिटिल चॅम्पस या कार्यक्रमात भाग घेतला होता. या कार्यक्रमात पहिल्या पाच स्पर्धकांमध्ये तिची निवड करण्यात आली होती. या कार्यक्रमानंतर एक गायिका म्हणून ती नावारूपाला आली तर दुसरीकडे अभिनय हा लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा आहे. अभिनय गेल्या अनेक दिवसांपासून कित्येक एकांकिका स्पर्धा जिंकत आहे.
सतीश राजवाडेच्या ती सध्या काय करते या चित्रपटाच्या कथेचे तर सध्या कौतुक होत आहे. पण त्याचसोबत या चित्रपटातील गाणीदेखील रसिकांच्या ओठावर रुळली आहेत. एक नजर टाकूया या चित्रपटांच्या गीतांवर...
हृदयात वाजे समथिंग
हृदयात वाजे समथिंग हे गाणे विधित पाटणकरने गायले आहे तर या गाण्याला संगीत विश्वजीत जोशीने दिले आहे. हे गाणे सध्या चांगलेच गाजत आहे.
परिकथा
निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेले परिकथा हे गाणे कौशिक देशपांडे यांनी गायले आहे. हे गाणे खूपच चांगल्यारितीने चित्रीत करण्यात आले आहे.
कितीदा नव्याने
कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे या गीतासाठी गीतकार देवायनी कर्वे-कोठारेचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे. हे गाणे मंदार आपटे आणि आर्या आंबेकर यांनी गायले आहे.