'तान्हाजी'नंतर शरद केळकरच्या बायकोचे फोटो होतायेत व्हायरल, काय आहे त्यामागे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 12:59 PM2020-02-13T12:59:49+5:302020-02-13T13:03:14+5:30

Tanhaji Movie : 'सात फेरे' या मालिकेमुळे ही जोडी घराघरांत पोहोचली. 'आक्रोश' या मालिकेत दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं.

Did You Know After Tanhaji Movie, Sharad kelkar wife Keerti Gaekwad Photo Trending On Internet | 'तान्हाजी'नंतर शरद केळकरच्या बायकोचे फोटो होतायेत व्हायरल, काय आहे त्यामागे कारण

'तान्हाजी'नंतर शरद केळकरच्या बायकोचे फोटो होतायेत व्हायरल, काय आहे त्यामागे कारण

googlenewsNext

छोटा पडदा असो किंवा मग मोठा पडदा, मराठी सिनेमा असो किंवा मग बॉलिवूड  या सगळ्या माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाने शरद केळकरने रसिकांची पसंती मिळवली आहे. आपला सहज सुंदर अभिनय आणि एकसे बढकर एक सिनेमांमुळे त्याने आपली छाप रसिकांवर पाडली आहे. त्यातच  ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत शरद केळकरने तर सा-यांच्या मनाचा ताबाच मिळवला आहे. त्यामुळे शरद केळकर विषयी प्रत्येक घडामोडी जाणून घेण्याची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता असते. शरद केळकरच्या कुटुंबाविषयी, तो कुठे फिरतो, काय करतो सगळ्या गोष्टी चाह्त्यांना जाणून घेण्यात रस असतो. 


याचनिमित्ताने शरद केळकरची बायको  किर्ती केळकरचीही लोकप्रियता अधिक वाढल्याचे पाहायला मिळते आहे. सोशल मीडियावर तिचेच फोटो जास्त व्हायरल होत आहेत. सर्वांत क्यूट कपल म्हणून शरद केळकर आणि किर्ती केळकरला पाहिलं जातं. 'सात फेरे' या मालिकेमुळे ही जोडी घराघरांत पोहोचली. 'आक्रोश' या मालिकेत दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं.

पहिल्याच भेटीत शरदला किर्ती आवडली होती.  किर्ती ही माझ्यासाठी 'लकी चार्म' आहे, असं शरद म्हणतो. किर्तीला भेटल्यावर मला 'सात फेरे' आणि 'सिंदूर तेरे नाम का' असे मोठे प्रोजेक्ट्स मिळाले, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.रिअल लाइफमध्ये किर्ती फॅशनबाबत खूप सजग आहे. सोशल मीडियावर नजर टाकल्यास वेगवेगळ्या अंदाजात कॅप्चर झालेले लूक कुणालाही घायाळ करतील असेच आहेत.  त्यामुळे सध्या किर्तीचाही सोशल मीडियावर बोलबाला असल्याचे पाहायला मिळते.

Web Title: Did You Know After Tanhaji Movie, Sharad kelkar wife Keerti Gaekwad Photo Trending On Internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.