चिमुकलीला ओळखलंत का?, ही आहे प्रसिद्ध अभिनेत्री अन् आई-वडील, नवरादेखील सिनेइंडस्ट्रीत कार्यरत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 03:39 PM2023-11-01T15:39:45+5:302023-11-01T15:47:53+5:30
मराठी कलाविश्वात अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी आई- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत इंडस्ट्रीत पदार्पण केलं.
सध्या सोशल मीडियावर बालपणीच्या फोटोंचा ट्रेंड पाहायला मिळतो. या ट्रेंडमध्ये सेलिब्रेटी मंडळीदेखील सामील झाले आहेत. बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेइंडस्ट्री, सेलिब्रेटींनी देखील त्यांच्या बालपणींचे फोटो शेअर करताना दिसतात आणि आपल्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. दरम्यान मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा बालपणीचा सोशल मीडियावर व्हायरल होतोया. फोटोत आईसोबत उभी असलेली ही चिमुकली आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐवंढच नाही तर तिची आईही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
मराठी सिनेसृष्टी अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी आई- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये स्टार किड्स म्हणून पदार्पण केलं. अभिनेत्री क्षिती जोग ही त्यापैकीच एक आहे. अभिनेत्री क्षिती जोग प्रसिद्ध अभिनेते अनंत जोग आणि अभिनेत्री उज्वला जोग कन्या आहे. त्यामुळेच अभिनयाचं बाळकडू क्षितीला घरातूनच मिळालं. उज्वला जोग यांनी 'तू तेव्हा तशी' मालिकेत सौरभच्या मावशीच्या भूमिका साकारली होती. तर अनंत जोग 'रावडी राठोड','नो एन्ट्री', 'शांघाय', 'दहेक', 'कच्ची सडक','सरकार', 'लाल सलाम', 'रिस्क', 'सिंघम' यांसारख्या सुपहिट सिनेमातल्या त्यांच्या भूमिकाही गाजल्या आहेत. त्यांनी अनेक हिंदी सिनेमात खलनायकाच्या भूमिका साकारत रसिकांचे मनोरंजन केले आहे.
क्षिती जोग 'दामिनी' या गाजलेल्या मालिकेतून प्रकाशझोतात आली होती. 'तू तिथे मी','गंध फुलांचा गेला सांगून' मराठी मालिकेसोबतच हिंदी मालिकेतही तिच्या भूमिकांनी तिने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले आहे. 'घर की लक्ष्मी बेटिया','साराभाई vs साराभाई', 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतही क्षिती झळकली होती.
क्षितीने अभिनेता हेमंत ढोमेसह लग्न करत संसार थाटला आहे. दोघेही सोशल मीडियावर त्यांचे खास फोटो शेअर करत त्यांच्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात.