आईच्या कडेवर असलेली ही चिमुकली आज गाजवतेय चित्रपटसृष्टी, ओळखा पाहू कोण आहे ती ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 07:00 AM2023-01-29T07:00:00+5:302023-01-29T07:00:02+5:30

मराठी सिनेमांमध्ये जरी दीप्तीचा वावर कमी दिसत असला तरी साऊथमध्ये दीप्तीचा चांगलाच बोलबाला आहे. या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे.

Did you know this little girl today she is a famous actress in south cinema | आईच्या कडेवर असलेली ही चिमुकली आज गाजवतेय चित्रपटसृष्टी, ओळखा पाहू कोण आहे ती ?

आईच्या कडेवर असलेली ही चिमुकली आज गाजवतेय चित्रपटसृष्टी, ओळखा पाहू कोण आहे ती ?

googlenewsNext

बऱ्याचदा कलाकार त्यांच्या बालपणींचे फोटो आणि त्यांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होतात. दरम्यान असाच एक मराठी चित्रपटसृष्टीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीचाही बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोतील चिमुरडीला तुम्ही ओळखलंत का?, आज या मराठी अभिनेत्रीचा वाढदिवस आहे.

ही दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री दीप्ती सती आहे. दिप्ती आज आपला वाढदिवस साजरा करते आहे.  दीप्तीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झालं होतं. इतकेच नाही तर या चित्रपटात दीप्ती बोल्ड व ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली. या सिनेमासाठी दीप्तीची निवड 96 मुलींच्या ऑडिशन्समधून झाली होती. मराठी सिनेमांमध्ये जरी दीप्तीचा वावर कमी दिसत असला तरी साऊथमध्ये दीप्तीचा चांगलाच बोलबाला आहे.

मुंबईत जन्मलेल्या दीप्तीने सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. दीप्तीने 2014 मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता. या सौंदर्य स्पर्धेत तिने 'फेमिना मिस आयर्न मेडेन'चा किताब पटकावला.दीप्तीने भरतनाट्यम आणि कथ्थकचे प्रशिक्षण घेतले आहे. 2015 मध्ये, दीप्तीने 'नी-ना' या मल्याळम चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.
दीप्ती सतीने एमएक्स प्लेयरच्या 'ओन्ली फॉर सिंगल्स' या वेब सीरिजमध्येही काम केले आहे. ज्यामध्ये त्याने विवान शाहसोबत मुख्य भूमिका साकारली होती.


 

Web Title: Did you know this little girl today she is a famous actress in south cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.