फोटोतील स्त्री वेशातील या अभिनेत्याला ओळखलंत का?, सिनेमाला १२ वर्षे झाल्याच्या निमित्ताने शेअर केली स्पेशल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 11:29 AM2023-05-06T11:29:27+5:302023-05-06T11:30:03+5:30

स्त्री वेशातील अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Did you recognize the actor in the female disguise in the photo?, a special post shared on the occasion of 12 years of the movie. | फोटोतील स्त्री वेशातील या अभिनेत्याला ओळखलंत का?, सिनेमाला १२ वर्षे झाल्याच्या निमित्ताने शेअर केली स्पेशल पोस्ट

फोटोतील स्त्री वेशातील या अभिनेत्याला ओळखलंत का?, सिनेमाला १२ वर्षे झाल्याच्या निमित्ताने शेअर केली स्पेशल पोस्ट

googlenewsNext

कलाकार सोशल मीडियावर सक्रीय असतात आणि ते या माध्यमातून आपल्या चाहत्यांना अपडेट देत असतात. त्यांच्या या सोशल मीडियावरील पोस्ट बऱ्याचदा चर्चेत येत असतात. अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या फोटोत एक अभिनेता स्त्री वेशात पाहायला मिळतो आहे. हा फोटो दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नसून अभिनेता सुबोध भावे(Subodh Bhave)चा आहे. त्याने असा वेश बालगंधर्व (Balgandharva Movie) सिनेमात केला होता. आज या चित्रपटाला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याने स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता सुबोध भावेने इंस्टाग्रामवर बालगंधर्व सिनेमातील फोटो शेअर करत लिहिले की, आज १२ वर्षे झाली "बालगंधर्व" चित्रपट प्रदर्शित होऊन. सुबोधच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. ते या चित्रपटातील त्याचे काम आणि कलाकृतीचं भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत. निर्माता-दिग्दर्शक रवी जाधवने कमेंटमध्ये लिहिले की, अप्रतिम आठवणी. एका युजरने लिहिले की, मला फार आवडतो तो चित्रपट आणि तुमचे त्यातील काम खूप आवडले. आणखी एका युजरने म्हटले की, सुबोध भावे, ऐसा नट होणे नाही.


अभिनेता सुबोध भावेचा २०११ साली रिलीज झालेल्या बालगंधर्व चित्रपटाला आज १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात बालगंधर्व यांची भूमिका सुबोधने साकारली होती. तर दिग्दर्शन रवी जाधवने केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. सुबोध भावेने एका मुलाखतीत म्हटले होते की, संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ आम्हाला प्रत्यक्ष बघता आला आणि काही काळाकरता का होईना प्रत्यक्ष जगता ही आला. त्या सर्वच कलाकारांनी केलेलं काम प्रचंड मोठं आहे,चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही त्यांना आणि त्यांच्या कामाला सलाम करू शकलो. 

Web Title: Did you recognize the actor in the female disguise in the photo?, a special post shared on the occasion of 12 years of the movie.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.