नदीकाठी बसलेल्या अभिनेत्याला ओळखलं का? 'बिग बॉस मराठी'मध्ये केला होता राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 17:56 IST2023-11-28T17:56:15+5:302023-11-28T17:56:40+5:30
Marathi actor: या अभिनेत्याने प्रार्थना बेहेरेसोबतही स्क्रीन शेअर केली आहे.

नदीकाठी बसलेल्या अभिनेत्याला ओळखलं का? 'बिग बॉस मराठी'मध्ये केला होता राडा
प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता छंद असतो, आवड असते. यात काही जण त्यांचे छंद जोपासतात. अगदी कितीही बिझी शेड्युल असलं तरीदेखील ते त्यांच्या आवडीनिवडींना प्रथम प्राधान्य देतात. यात असेच काही कलाकार मंडळीदेखील आहेत. ज्यांना अभिनयासह अन्य काही छंद जोपासायला आवडतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अभिनेत्याची चर्चा रंगली आहे.
मराठी सिनेसृष्टीतील एका लोकप्रिय अभिनेत्याला बाइक रायडिंग आणि भटकंती करायची प्रचंड आवड आहे. त्यामुळे तो कायम वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत असतो. या अभिनेत्याने आतापर्यंत अनेक सिनेमा, रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे. अलिकडेच तो 'बिग बॉस मराठी'मध्येही झळकला होता.
सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्याचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो मस्तपैकी एका नदीच्या काठावर बसला आहे. त्याच्यासोबत त्याची सायकल सुद्धा दिसून येत आहे. हा फोटो या अभिनेत्याने अॅमस्टरडॅम, नेदरलँड येथे काढला आहे.
दरम्यान, या फोटोमध्ये हा अभिनेता पाठमोरा बसल्यामुळे तो नेमका कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर, हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून आरोह वेलणकर आहे. अलिकडेच आरोह 'बिग बॉस मराठी'च्या सिझन ४ मध्ये झळकला होता. गेम खेळण्याच्या त्याच्या स्टाइलमुळे तो विशेष लोकप्रिय ठरला होता. त्याचसोबत तो 'फनरल', 'रेगे', 'हॉस्टेल डेज' यांसारख्या सिनेमांमध्ये झळकला आहे. तर, 'लाडाची मी लेक गं' यांसारख्या मालिकांमध्येही त्याने काम केलं आहे.