अलका कुबल यांच्या धाकट्या मुलीला पाहिलंत का?, ती आहे या क्षेत्रात कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 07:00 AM2022-03-20T07:00:00+5:302022-03-20T07:00:00+5:30

Alka Kubal : अलका कुबल आणि समीर आठल्ये यांचे लव्ह मॅरेज आहे. समीर आठल्ये हे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आहेत. त्यांना दोन मुली आहेत ईशानी आणि कस्तुरी.

Did you see Alka Kubal's youngest daughter? She is working in this field | अलका कुबल यांच्या धाकट्या मुलीला पाहिलंत का?, ती आहे या क्षेत्रात कार्यरत

अलका कुबल यांच्या धाकट्या मुलीला पाहिलंत का?, ती आहे या क्षेत्रात कार्यरत

googlenewsNext

बॉलिवूड असो किंवा मग मराठी सिनेइंडस्ट्री स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. कलाक्षेत्रात पदार्पण केले नसले तरी हे स्टार किड्स सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलेदेखील अभिनय क्षेत्रात एन्ट्री करतात, यात काही नाविन्य नाही. मात्र असेही काही स्टार किड्स आहेत ज्यांनी अभिनयाऐवजी करिअरसाठी दुसऱ्या क्षेत्राची निवड केली आहे. यात मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांच्या मुलींचा विशेष उल्लेख करावा लागेल. 

अलका कुबल आणि समीर आठल्ये यांचे लव्ह मॅरेज आहे. समीर आठल्ये हे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आहेत. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे दोघांची पहिली भेट झाली आणि मैत्री झाली तिथूनच दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. त्यानंतर दोघांनीही लग्न करत सुखी संसाराला सुरुवात केली. अलका कुबल यांना दोन मुली आहेत. ईशानी आणि कस्तुरी.


अलका कुबल यांच्या थोरली लेक ईशानीचे लग्न नुकतेच पार पडले. या लग्न सोहळ्याचे फोटो खूप व्हायरल झाले होते. ईशानी ही पायलट असून तिला लहानपणापासून वैमानिक व्हायचं होते. २०१५ मध्ये तिला वैमानिकाचं 'लाइफटाइम लायसन्स' मिळालं. निशांत वालिया असे तिच्या पतीचे नाव आहे.निशांत हा मुळचा दिल्लीचा राहणारा आहे. 


तर अलका कुबल यांची धाकटी लेक कस्तुरी परदेशात डर्मेटॉलॉजिस्टचे शिक्षण घेते आहे. आलका कुबल यांच्या दोन्ही लेकी सिनेइंडस्ट्रीऐवजी वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. 

Web Title: Did you see Alka Kubal's youngest daughter? She is working in this field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.