लेथ जोशी या मराठी चित्रपटाचे पोस्टर तुम्ही पाहिले का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 05:01 AM2018-05-28T05:01:00+5:302018-05-28T10:31:00+5:30
अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेला लेथ जोशी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे टीजर ...
अ ेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेला लेथ जोशी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे टीजर पोस्टर नुकतेच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले असून या पोस्टरमधून चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. अमोल कागणे स्टुडिओजच्या अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून प्रवाह निर्मिती आणि डॉन स्टुडिओजच्या सहकार्यकाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
मंगेश जोशी हा नवा दिग्दर्शक या चित्रपटाद्वारे पदार्पण करत असून लेखनही त्यांचेच आहे. चित्रपटाचे टीजर पोस्टर खूपच लक्षवेधी आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या चित्रपटाच्या पोस्टरला एकूणच चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
आजवर तब्बल २१ महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला गेला असून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपटासह बरेच पुरस्कारही या चित्रपटाने मिळवले आहेत. यंदाच्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवातही हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. येत्या १३ जुलैला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनी याआधी हलाल या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट लेखक राजन खान यांच्या कथेवर आधारित होता आणि याचे दिग्दर्शन राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी केले होते. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव, छाया कदम, अमोल कागणे, विमल म्हात्रे, संजय सुगावकर आदी कलाकारांनी अभिनय केला होता. शिवाजी लोटण पाटील यांनी या चित्रपटात तिहेरी तलाकचा मुद्दा त्रिकोणी प्रेमकथेच्या माध्यमातून मांडला होता. विवाह आणि तलाक या जीवनातील दोन महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मुस्लिम स्त्रियांच्या भावनांचा कितपत आदर केला जातो, या विषयावर आधारित हा चित्रपट होता. हा चित्रपट अनेक महोत्सवांमध्ये गौरवला गेला होता. तसेच या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले. या चित्रपटानंतर अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांची जोडी लेथ जोशी हा चित्रपट घेऊन येत असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाबाबत चांगलीच उत्सुकता आहे.
Also Read : निर्माते अमोल कांगणे सांगतायेत खूप अडचणींवर मात करत हलाल चित्रपटाची निर्मिती केली