'दोस्तीगिरी' सिनेमाचा टिझर तुम्ही पाहिला का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:57 PM2018-07-17T14:57:42+5:302018-07-17T14:58:18+5:30
‘आम्हांला जो नडतो त्याला आम्ही तोडतो’ अशा त-हेच्या तरूणाईचे लक्ष वेधून घेणा-या डायलॉग्समूळे सोशल मीडियावर रिलीज झालेल्या दोस्तीगिरीच्या टिझरला युवा वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कॉलेजविश्वातल्या ‘अनकन्डिशनल’ मैत्रीला सेलिब्रेट करणारा ‘दोस्तीगिरी’ सिनेमा 24 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये येणा-या अंतरराष्ट्रीय मैत्री दिनाला साजरा करणा-या ह्या सिनेमाचा टिझर नुकताच लाँच झाला आहे. ‘आम्हांला जो नडतो त्याला आम्ही तोडतो’ अशा त-हेच्या तरूणाईचे लक्ष वेधून घेणा-या डायलॉग्समूळे सोशल मीडियावर रिलीज झालेल्या दोस्तीगिरीच्या टिझरला युवा वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ह्यासंदर्भात निर्माते संतोष पानकर म्हणतात, “मनोज वाडकर ह्यांनी लिहीलेले डायलॉग्स पटकन लक्षात राहणारे आणि तोंडात बसणारे आहेत. तरूणाईला वनलाइनर्स आणि अशा त-हेचे संवाद खूप आवडतात. त्यामूळे युवावर्गाला हा सिनेमा नक्कीच आवडेल असं आम्हांला वाटते.”
संतोष पानकर निर्मित, विजय शिंदे दिग्दर्शित दोस्तीगिरी सिनेमात संकेत पाठक, अक्षय वाघमारे, विजय गिते, पुजा मळेकर, पुजा जयस्वाल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील.'अरिहंत मुव्हिज क्रिएशन्स' प्रस्तूत 'मोरया मुव्हिज क्रिएशन्स' निर्मित "दोस्तीगिरी" या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद मनोज वाडकर ह्यांनी लिहीले आहेत. रोहन-रोहन ह्यांचे संगीत असलेला दोस्तीगिरी चित्रपट 24 ऑगस्ट 2018 ला रिलीज होणार आहे.
'दुहेरी' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता संकेत पाठक आता लवकरच रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. संतोष वसंत पानकर निर्मित आणि विजय शिंदे दिग्दर्शित दोस्तीगिरी सिनेमातून संकेत पाठक चित्रपटसृष्टीत आपला डेब्यू करत आहे. या चित्रपटाचे कथानक मैत्री भोवती गुंफण्यात आल्याचे समजतेय.
संकेत ह्याविषयी सांगतो, “ड्रिंमींग ट्वेंटिफोर सेवनच्या दुहेरी मालिकेमूळे मला खूप प्रसिध्दी मिळाली. आज मी महाराष्ट्रात कुठेही जातो, तर मला माझ्या नावाने नाही तर दुष्यंत अशी हाक मारतात. त्यामुळे मालिकेसाठी घेतलेली मेहनत आणि स्टार बनायचे माझे स्वप्न पूर्ण झाले.” “पण प्रत्येक कलाकाराला एकदा तरी रूपेरी पडद्यावर झळकावेसे वाटतेच. मलाही सिनेसृष्टीत पदार्पण करण्याची इच्छा होती. माझं हे स्वप्न आता दोस्तीगिरी सिनेमामुळे सत्यात उतरणार आहे. मनोज वाडकर ह्यांची कथा, पटकथा आणि संवांद असलेला हा सिनेमा जेव्हा माझ्याकडे आला, मी लगेच सिनेमा करायला होकार कळवला.”