'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिलंत का?, दिसते खूप सुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 08:05 PM2022-02-10T20:05:39+5:302022-02-10T20:09:12+5:30

'सैराट' (Sairat Movie) चित्रपटातून सुरेश विश्वकर्मा (Suresh Vishwakarma) प्रसिद्धीच्या झोतात आले. मात्र त्याची पत्नी लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.

Did you see the real life wife of Archie's father in 'Sairat'? Looks very beautiful! | 'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिलंत का?, दिसते खूप सुंदर!

'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिलंत का?, दिसते खूप सुंदर!

googlenewsNext

नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' (Sairat Movie) चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने १०० कोटींच्या वर गल्ला जमविला. या चित्रपटातील आर्ची आणि परशाची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली. या चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिका अभिनेता सुरेश विश्वकर्माने (Suresh Vishwakarma) साकारली आहे. यापूर्वी देखील या अभिनेत्याने बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. सुरेश यांच्या पत्नी लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात. सुरेश विश्वकर्मा यांच्या पत्नीचे नाव विद्या असून त्या दिसायला खूप सुंदर आहे. 

'सैराट'ने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं. महाराष्ट्राच काय सगळीकडेच सिनेमाची खूप चर्चा झाली. 'सैराट' सिनेमाने प्रत्येक कलाकाराला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सर्व काही मिळवून दिलं. प्रेक्षकांनीसुद्धा या सगळ्या कलाकारांना भरभरुन प्रेम दिलं. आर्ची, परश्या, सल्या आणि लंगड्या या भूमिका साकारणाऱ्या नवोदित कलाकारांनी पहिल्याच चित्रपटातून त्यांच्यातील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले.

तसेच या चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिका साकारणारे सुरेश विश्वकर्मादेखील प्रसिद्धी झोतात आले. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. सुरेश यांच्या पत्नीचे नाव विद्या विश्वकर्मा आहे. सुरेश आणि विद्या यांना एक मुलगी असून तिचे नाव ओवी आहे. विद्या दिसायला खूप सुंदर आहे. सैराट चित्रपटातून सुरेश विश्वकर्मा प्रसिद्धीच्या झोतात आले.

सुरेश विश्वकर्मा यांनी लोकनाट्य प्रकारात मावशी, सोंगाड्यापासून वगातील सर्व मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर विश्वकर्मा गावातून  मुंबईत आले आणि त्यांच्या स्ट्रगलला सुरुवात झाली. या दरम्यान त्यांनी स्टेज शो, मालिका, चित्रपटांपासून ते अगदी पथनाट्यांमध्येही काम केले. पण, त्यांना खरी ओळख मिळाली ती नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटामुळे. सुरेश विश्वकर्माने सैराट चित्रपटाशिवाय रेगे, महिमा खंडोबाचा, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या मराठी चित्रपटात झळकले आहेत. 
 

Web Title: Did you see the real life wife of Archie's father in 'Sairat'? Looks very beautiful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.