मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केला मेकओव्हर, नवीन लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 05:52 PM2022-02-15T17:52:47+5:302022-02-16T10:05:47+5:30

कलाकारांनेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहिला आवडते. चाहत्यांनादेखील कलाकारच्या आयुष्यात काय नवं होतंय हे जाणून घेण्याची उत्सुकता असतात.

Did you seen Marathi actress Sanskriti Balgude new look | मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केला मेकओव्हर, नवीन लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती

मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केला मेकओव्हर, नवीन लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती

googlenewsNext

कलाकारांनेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहिला आवडते. चाहत्यांनादेखील कलाकारच्या आयुष्यात काय नवं होतंय हे जाणून घेण्याची उत्सुकता असतात. त्यामुळेच सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतात. आपले नवे फोटो, व्हिडीओ आणि प्रोजेक्टबाबतची माहिती ते सोशल मीडियावर देत असतात.

अभिनेत्री संस्कृती बालगुडेही सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. संस्कृती आपल्या पर्सनल आणि प्रोफेशन लाईफबाबतची सगळी माहिती चाहत्यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून देत असते. नुकताच संस्कृतीने तिचा लूक चेंज केला आहे. संस्कृतीने नवा हेअर कट केला असून हेअर कलरही केला आहे. त्याचा मेकओव्हर चाहत्यांनी खूप आवडला आहे. किती सुंदर, ब्युटिफुल,सुबब,किलर अशा कमेंट्स तिच्या या फोटोवर चाहत्यांनी केल्या आहेत.

कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचं कसब अभिनेत्री संस्कृती बालगुडेकडे आहे. तिने आजवर बऱ्याच अवघड भूमिकाही अगदी सोप्या पद्धतीने सादर करीत रसिकांची मनं जिंकली आहेत. अनेक सिनेमे न स्वीकारता सिलेक्टिव्ह राहायला संस्कृतीला आवडते.

पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

 

Web Title: Did you seen Marathi actress Sanskriti Balgude new look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.