'ए गरम बांगड्या, गरम बांगडया', 'एलिझाबेथ एकादशी'मधील झेंडू आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 07:00 AM2021-06-20T07:00:00+5:302021-06-20T07:00:00+5:30

'एलिझाबेथ एकादशी'मधील झेंडूला आता ओळखणं झालंय कठीण

Difficult to recognized 'Elizabeth Ekadashi' fame zendu | 'ए गरम बांगड्या, गरम बांगडया', 'एलिझाबेथ एकादशी'मधील झेंडू आता दिसते अशी

'ए गरम बांगड्या, गरम बांगडया', 'एलिझाबेथ एकादशी'मधील झेंडू आता दिसते अशी

googlenewsNext

ए गरम बांगड्या, गरम बांगडया… हे शब्द कानावर पडताच एलिझाबेथ एकादशीमधील झेंडू आठवली ना... झेंडूची भूमिका बालकलाकार सायली भंडारकवठेकर हिने साकारली होती. २०१४ साली परेश मोकाशी दिग्दर्शित एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अभिनेत्री नंदिता धुरी, श्रीरंग महाजन, सायली भंडारकवठेकर, पुष्कर लोणारकर, दुर्गेश बडवे हे बालकलाकार मुख्य भूमिकेत होते. 


श्रीरंग महाजनने ज्ञानेश तर सायलीने मुक्ता अर्थात झेंडूची भूमिका साकारली होती. आपली सायकल वाचवण्यासाठी या बालकलाकारांनी जो काही आटापिटा केला त्यातून घडणाऱ्या घडामोडीचे दर्शन दिग्दर्शकाने अतिशय उत्तमपणे रेखाटले आहे.


विशेष म्हणजे यातील “ए गरम बांगड्या, गरम बांगडया…” हा झेंडूच्या तोंडी असलेला संवाद प्रेक्षकांच्या आजही स्मरणात राहतो. झेंडूची भूमिका साकारणारी सायली भंडारकवठेकर हिला अभिनयापेक्षा नृत्याची जास्त आवड आहे.

अगदी लहान असल्यापासूनच सायलीने भरतनाट्यमचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती आणि यातच तिला आपले करियर करायचे आहे.


पंढरपूर येथील कवठेकर प्रशालेत शिकत असताना सायली, पुष्कर आणि दुर्गेश यांना चित्रपटाच्या ऑडिशनमध्ये निवडले गेले होते. ज्ञानेशची भूमिका साकारणाऱ्या श्रीरंग महाजनने याआधी चिंटू २ चित्रपटात काम केले होते. श्रीरंग महाजन हा मूळचा पुण्याचा येथूनच त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.


तर पुष्कर लोणारकर या सिनेमा व्यतिरिक्त टीटीएमएम (तुझं तू माझं मी), रांजण, बाजी, चि व चि सौ का चित्रपटात पहायला मिळाला आहे. 

Web Title: Difficult to recognized 'Elizabeth Ekadashi' fame zendu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.