'सापडले ते दिघे साहेब', अमृता खानविलकरची 'ती' पोस्ट आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 11:54 AM2022-06-15T11:54:05+5:302022-06-15T11:54:44+5:30

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल होताना दिसते आहे.

Dighe Saheb 'found', Amruta Khanvilkar's 'this' post came up in the discussion | 'सापडले ते दिघे साहेब', अमृता खानविलकरची 'ती' पोस्ट आली चर्चेत

'सापडले ते दिघे साहेब', अमृता खानविलकरची 'ती' पोस्ट आली चर्चेत

googlenewsNext

अभिनेता प्रसाद ओक अभिनीत ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer : Mukkam Post Thane Marathi Movie) या चित्रपटाची सगळीकडे खूप चर्चा झाली. अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak ) याचा चित्रपटातील अभिनय पाहून सगळेच भारावून गेले. शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारीत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाची प्रशंसा बऱ्याच कलाकारांनी केली. दरम्यान, आता अभिनेत्री अमृता खानविलकर हिनेदेखील प्रसाद ओकच्या कामाची आणि धर्मवीर चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे.

अमृता खानविलकरने इंस्टाग्रामवर प्रसाद ओकसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, भेटला विठ्ठल ...... प्रिय प्रसाद, गेल्या काही महिन्यांची गडबड धावपळ तुला माहितीच आहे तेव्हा ”धर्मवीर” बघायला उशीर झाला त्या साठी सॉरी. पण कलाकृती अजरामर असेल तर ती कधीही पहिली तरीही ती तितकीच प्रभावी असते . 
तिने पुढे लिहिले की, काल धर्मवीर पाहिला... प्रसाद ओक शोधात होते पण तो कुठेच सापडला नाही... सापडले ते दिघे साहेब... मी त्यांना कधी पाहिलं नाही भेटले नाही पण काल ते ही घडला असं वाटलं... ते डोळे... हाव भाव... बोलणं... ते समर्पण तुझ्यासारख्या नटालाच हे जमू शकलं असतं आणि तू त्याचं सोनं केलंस. भोरच्या वाड्यात खुर्चीवर बसून ज्या कळकळीने मी तुला सांगत होते  प्रसाद एक फिल्म तुझ्यातल्या नटासाठी कर रे ते ह्या चित्रपटात मी डोळे भरून बघितलं आणि अनुभवलं. हा चित्रपट खऱ्या अर्थाने तुझ्यासाठी घडवणाऱ्या प्रवीण तरडेचे मी मनापासून आभार मानते.


अमृता खानविलकर म्हणाली की, तुला मी सांगू शकत नाही प्रसाद… तुला अशा प्रकारे पडद्यावर पाहून मला किती अभिमान आणि आनंद झाला आहे
स्वत:च्या प्रवासात इतरांनाही स्वत:ची जाणीव करून देऊन त्यांना त्यांच्या मार्गाकडे नेण्यास मदत करणारे फार कमी आहेत आणि तू असा माझा दुर्मिळ मित्र आहेस. फक्त तुझ्याबद्दल प्रेम आणि आदर.

Web Title: Dighe Saheb 'found', Amruta Khanvilkar's 'this' post came up in the discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.