Sher Shivraj Box Office Collection : 500 वर शो हाऊसफुल! तीन दिवसांत ‘शेर शिवराज’ कमावला इतक्या कोटींचा गल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 04:55 PM2022-04-26T16:55:30+5:302022-04-26T16:56:26+5:30
Sher Shivraj Box Office Collection : ‘शेर शिवराज’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाचे 500 हून अधिक शो हाऊसफुल आहेत. रिलीजनंतरच्या पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने कोटींचा गल्ला जमवला आहे.
Sher Shivraj Box Office Collection : फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या चित्रपटानंतर लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj ) हा सिनेमा प्रदर्शित झालाये आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाचे 500 हून अधिक शो हाऊसफुल आहेत. रिलीजनंतरच्या पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने कोटींचा गल्ला जमवला आहे.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ‘शेर शिवराज’च्या तीन दिवसांच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत. त्यानुसार, पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ‘शेर शिवराज’ने 1.05 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी शनिवारी 1.45 कोटींचा बिझनेस केला तर रविवारी 1.70 कोटींचा गल्ला जमवला. चित्रपटाची तीन दिवसांची एकूण कमाई 4.20 कोटींवर पोहोचली आहे. ‘केजीएफ 2’ आणि ‘जर्सी’ सारखे तगडे सिनेमे समोर असताना ‘शेर शिवराज’ने तीन दिवसांत 4.20 कोटींची कमाई करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
Strong word of mouth has come into play and that is converting into footfalls... #Marathi film #SherShivraj withstands opponents [#KGF2, #Jersey], goes from strength to strength with each passing day in #Maharashtra... Fri 1.05 cr, Sat 1.45 cr, Sun 1.70 cr. Total: ₹ 4.20 cr. pic.twitter.com/4Asf7Yo374
— taran adarsh (@taran_adarsh) April 25, 2022
फर्जंद,फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या चित्रपटाच्या यशानंतर दिग्पाल लांजेकर यांचे शिवराज अष्टकातील ‘शेर शिवराज’ हे चौथे चित्रपुष्प आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची घटना, यामागे असलेलं महाराजांचं युद्धकौशल्य यावर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
याआधी रिलीज झालेल्या दिग्पाल यांच्या ‘पावनखिंड’ या चित्रपटालाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरकोट्यवधीची कमाई केली होती.
‘शेर शिवराज’ या चित्रपटात चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर, अफजलखानाची भूमिका बॉलिवूड स्टार मुकेश ऋषी यांनी साकारली आहे. मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर,वर्षा उसगांवकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, वैभव मांगले आदींच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.