दिग्पाल लांजेकरच्या 'सुभेदार' सिनेमाची रिलीज डेट बदलली, लोकाग्रहास्तव २५ ऑगस्टऐवजी ‘या’ दिवशी होणार रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 02:21 PM2023-07-18T14:21:25+5:302023-07-18T14:27:01+5:30
या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वा़ट पाहत आहेत. मात्र आता या सिनेमाबाबत एक अपडेट समोर आली आहे. ‘सुभेदार’च्या रिलीजची तारीख बदललण्यात आली आहे.
‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’ या सारख्या ऐतिहासिक सिनेमा दिग्पाल लांजेकर यांनी मराठी सिनेसृष्टीला दिले. आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून इतिहास प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं काम ते चोखपण करतात. लवकरच त्यांचा नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित ‘सुभेदार’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वा़ट पाहत आहेत. मात्र आता या सिनेमाबाबत एक अपडेट समोर आली आहे. ‘सुभेदार’च्या रिलीजची तारीख बदललण्यात आली आहे.
नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे भावनिक आणि कौटुंबिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करत त्यांचे शौर्या आणि पराक्रम दिग्पाल लांजेकर या चित्रपटातून सांगणार आहे. सुभेदारचं पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे.
सह्याद्रीला आज येतीया जाग, दख्खनचा गर्व ह्ये शिवाजी राजं..सादर आहे सुभेदार मधील पहिलंवहिलं, आपल्या सर्वांचं गाणं ‘मावळं जागं झालं रं..’! १८ ऑगस्टला गाजणार सिंहगडाचा पोवाडा.. असं कॅप्शन हा व्हिडीओ शेअर करताना चिन्मय मांडलेकरने दिलं आहे.
सुभेदार सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज झाल्यावर सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमाची रिलीज डेट बदल्याचं सांगण्यात आलं आहे. आधी हा सिनेमा २५ ऑगस्टला रिलीज होणार होता. पण आता मात्र हा सिनेमा आता एक आठवडा आधी म्हणजे १८ ऑगस्टला रिलीज होणार आहे. 'लोकाग्रहास्तव या सिनेमाची रिलीज डेट बदलण्याची कळतंय.
याआधी या सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. या मालुसरे यांचं संपूर्ण कुटुंबाची झलक पाहायला मिळाली होती. यात अभिनेते अजय पुरकर हे तानाजी मालुसरे हे पात्र साकारताना दिसत आहेत. त्यांच्या पत्नीची सावित्रीबाईंची भूमिका अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी साकारली आहे. थोरल्या भावाची भूमिका अभिजीत श्वेतचंद्र, तर त्यांच्या पत्नीची म्हणजे यशोदाबाईंची भूमिका शिवानी रांगोळे हिने साकारली आहे तर मालुसरे कुटुंबीयांचा आधारवड असणाऱ्या शेलारमामांच्या भूमिका समीर धर्माधिकारी साकारत आहेत.