दिलीप प्रभावळकर सुुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2016 12:19 PM2016-11-27T12:19:07+5:302016-11-27T12:19:07+5:30

 सोशल मिडीया हे माध्यम जितके फायदेशीर आहे. तितकेच परिणामकारकदेखील आहे. सोशल मिडीयाचा वापर कसा करावा हे प्रत्येकावर अवलंबून असत. ...

Dilip Prabhavalkar sukhupar | दिलीप प्रभावळकर सुुखरूप

दिलीप प्रभावळकर सुुखरूप

googlenewsNext
 
ोशल मिडीया हे माध्यम जितके फायदेशीर आहे. तितकेच परिणामकारकदेखील आहे. सोशल मिडीयाचा वापर कसा करावा हे प्रत्येकावर अवलंबून असत. काही लोक सोशल मिडीयाचा गैरवापर करून समाजातील वातावरण प्रदुषित करण्याचा प्रयत्न करत असतात. असाच प्रयत्न ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्याबाबतीत घडला आहे. कालपासून दिलीप प्रभावळकर यांच्याविषयीच्या वाईट बातमीचा मॅसेज सोशल मिडीयावर फिरत आहे. तसेच काही समाज प्रदुषित करणाºया लोकांनी त्यांच्याबाबत वाईट बातमीच्या पोस्ट धडाधड टाकल्या. मात्र ही बातमी खोटी ठरली आहे. हे केवळ एक अफवा असल्याचे समोर आले आहे. अशाच काही अफवांना यापूर्वी ही अनेक कलाकारांना सामोरे जावे लागले आहे. बॉलिवुडमध्येदेखील अभिनेत्री माधुरी दिक्षीतबाबतीत अशा बातम्या पसरल्या होत्या. यानंतर ही केवळ अफवा असल्याचे समोर आले. त्याचबरोबर मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील अभिनेता प्रथमेश परबला अशा अफवांना सामोरे जावे लागले होते. त्यावेळी प्रथमेशनेदेखील सोशल मिडीयावर मी सुखरूप असल्याचे सांगितले होते. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर  यांच्याबाबतीत असले म्हटले जाते की, दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे निधन झाले आहे. दिलीप पाडगावकर आणि दिलीप प्रभावळकर यांच्यातील नाव जवळपास सारखी असल्यामुळे हा गोंधळ उडाला असल्याचे सांगितले जाते. तसेच काहींनी या बातमीची खात्री न करता त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. पण दिलीप प्रभावळकर यांनी नेहमीच आपल्या अभियाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. त्यांनी एक डाव भुताचा, एक होता विदुषणक, आपली माणसं, पछाडलेला, छक्की माणसं, झपाटलेला असे अनेक चित्रपट मराठी इंडस्ट्रीला दिले आहेत. त्याचबरोबर सध्या ते फास्टर फेणे या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र असल्याचे समजत आहे. 

Web Title: Dilip Prabhavalkar sukhupar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.