शिवाजी पार्क मुंबई २८ मध्ये झळकणार दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, अशोक सराफ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 07:54 AM2017-08-17T07:54:52+5:302017-08-17T13:24:52+5:30

आजवर बऱ्याच मराठी कलाकारांनी कसदार अभिनयाच्या बळावर भारतीय चित्रपटसृष्टी गाजवली आहे. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत प्रेक्षकांचे ...

Dilip Prabhavalkar, Vikram Gokhale, Ashok Saraf, will be seen in Shivaji Park Mumbai 28 | शिवाजी पार्क मुंबई २८ मध्ये झळकणार दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, अशोक सराफ

शिवाजी पार्क मुंबई २८ मध्ये झळकणार दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, अशोक सराफ

googlenewsNext
वर बऱ्याच मराठी कलाकारांनी कसदार अभिनयाच्या बळावर भारतीय चित्रपटसृष्टी गाजवली आहे. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या सर्व कलाकारांना एकत्र आणून एखादी संवेदनशील कलाकृती तयार करण्याची किमया अद्याप कोणीही केलेली नाही. निर्माता-दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ या आगामी चित्रपटात ही किमया साधली आहे.
केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही लोकप्रिय असलेले दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, अशोक सराफ, सतीश आळेकर, शिवाजी साटम हे दिग्गज कलावंत ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहेत. सोबत शरद पोंक्षे, उदय टिकेकर, सविता मालपेकर, सुहास जोशी आणि भारती आचरेकर हे ज्येष्ठ कलावंतसुद्धा या चित्रपटात आहेत. त्यामुळे ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ हा चित्रपट म्हणजे मराठीतील दिग्ग्ज कलाकारांना एकाच वेळी चंदेरी पडद्यावर पाहण्याची पर्वणीच ठरणार आहे. यासोबतच संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दिप्ती लेले, मंजिरी फडणीस हे आजच्या पिढीतील तरुण कलाकारही आहेत. 
महेश वामन मांजरेकर प्रस्तुत आणि गौरी पिक्चर्स निर्मित ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ या सिनेमाची निर्मिती दिलीपदादा साहेबराव यादव आणि सिद्धार्थ केवलचंद जैन करत असून मंगेश रामचंद्र जगताप, शंकर रामेश्वर मिटकरी या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नेहमीच विविधांगी विषयांवर आधारित असलेल्या चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारे महेश मांजरेकर ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ या चित्रपटाचे  दिग्दर्शन करत आहेत. ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्यात संपन्न झाला असून चित्रीकरणालाही सुरुवात करण्यात आली आहे.
अभिराम भडकमकर यांनी ‘शिवाजी पार्क मुंबई २८’चे लेखन केले असून छायांकन करण रावत करत आहेत. सशक्त लिखाण, कुशल दिग्दर्शन तसेच चित्रपटातल्या कलाकारांच्या दमदार फळीमुळे ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ या चित्रपटाविषयीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Also Read : ‘मराठी चित्रपटापुढे हिंदीसह तेलगुचेही आव्हान’

Web Title: Dilip Prabhavalkar, Vikram Gokhale, Ashok Saraf, will be seen in Shivaji Park Mumbai 28

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.