​दिप्ती देवी बनली रेडिओ जॉकी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2017 06:10 AM2017-06-12T06:10:59+5:302017-06-12T15:47:32+5:30

मराठी-हिंदी मालिका, चित्रपटांतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री दिप्ती देवी आता रेडिओ जॉकी म्हणजे ‘आरजे’ बनून श्रोत्यांशी संवाद साधणार आहे. दिप्तीच्या ...

Dipti Devi became a radio jockey | ​दिप्ती देवी बनली रेडिओ जॉकी

​दिप्ती देवी बनली रेडिओ जॉकी

googlenewsNext
ाठी-हिंदी मालिका, चित्रपटांतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री दिप्ती देवी आता रेडिओ जॉकी म्हणजे ‘आरजे’ बनून श्रोत्यांशी संवाद साधणार आहे. दिप्तीच्या या नव्या इनिंगबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आगामी कंडिशन्स अप्लाय-अटी लागू हा मराठी चित्रपट तुम्हाला पाहावा लागेल. संस्कृती सिनेव्हिजन प्रोडक्शनचा डॉ. संदेश म्हात्रे निर्मित आणि गिरीश मोहिते दिग्दर्शित हा चित्रपट ७ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या चित्रपटात दिप्ती देवी ‘आरजे स्वरा हळदणकर' ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. याविषयी दिप्ती सांगते की, ‘आरजे’ ची भूमिका ही चॅलेंजिंग आणि तितकीच इंटरेस्टिंग असते. स्वत:सोबत इतरांची मनं आणि मतं जाणून घ्यायची जबाबदारी ‘आरजे’वर असते. या भूमिकेने मला खूप चांगला अनुभव दिला. स्वतंत्र विचारसरणीच्या स्वराचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दाखवताना ‘प्रेम’ आणि ‘लग्न’ या दोन्ही गोष्टींकडे आजची पिढी कशा पद्धतीने पाहाते यावर कंडिशन्स अप्लाय हा सिनेमा भाष्य करतो.
कंडिशन्स अप्लाय मध्ये दिप्ती देवी सोबत सुबोध भावे, अतुल परचुरे, राधिका विद्यासागर, मिलिंद फाटक, राजन ताम्हाणे, अतिशा नाईक, डॉ. उत्कर्षा नाईक, विनीत शर्मा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन संजय पवार यांचे आहे. छायांकन कृष्णा सोरेन यांचे असून संकलन निलेश गावंड यांचे आहे. या चित्रपटाला संगीत अविनाश-विश्वजीत यांनी दिले आहे. सचिन भोसले आणि अमोल साखरकर या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. प्रसाद पांचाळ कार्यकारी निर्माते आहेत.
७ जुलैला 'कंडिशन्स अप्लाय' सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Web Title: Dipti Devi became a radio jockey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.