पाठशाला फेम मिलिंद उके करणार सोबत या चित्रपटाचे दिग्दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 03:57 AM2018-05-07T03:57:28+5:302018-05-07T09:27:28+5:30
प्रेम हा विषय आजवर हिंदी-मराठी चित्रपटांतून असंख्य वेळा हाताळलेला विषय आहे. तरीही या विषयावर नवनवे चित्रपट तयार होतात. प्रेमाचे ...
प रेम हा विषय आजवर हिंदी-मराठी चित्रपटांतून असंख्य वेळा हाताळलेला विषय आहे. तरीही या विषयावर नवनवे चित्रपट तयार होतात. प्रेमाचे वेगळे कंगोरे, काळानुरूप बदलणाऱ्या नातेसंबंधांचा शोध या चित्रपटांमधून घेतला जातो. अशीच एक निरागस आणि तरल प्रेमकहाणी 'सोबत' या चित्रपटातून उलगडणार आहे. अल्पवयीन प्रेमाचा शोध हा चित्रपट घेणार आहे. कश्मिरा फिल्म्स प्रोडक्शन्स निर्मित, गुरुनाथ मिठबावकर यांची प्रस्तुती असलेला "सोबत"
हा चित्रपट २५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
"सोबत" ही गोष्ट आहे करण आणि गौरी या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्रेमिकांची... गौरीच्या घरून असलेल्या विरोधाला तोंड देत करण गौरीशी लग्न करतो. त्यानंतर मात्र तो मोठ्या अडचणीत सापडतो. गौरी आणि करणला लग्न केल्यावर कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते, गौरी आणि करणचे लग्न टिकते का असे अनेक प्रश्न हे कथानक उभे करते. आपल्या आजूबाजूला घडणारा ताजा विषय मनोरंजक पद्धतीने सोबत या चित्रपटात मांडण्यात आला आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पाठशाला, हमने जिना सिख लिया, डेहराडून डायरी, हनुमान असे बरेच हिंदी चित्रपट दिग्दर्शित केलेल्या मिलिंद उके यांनी'सोबत' हा दिग्दर्शित केला आहे. त्यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटातून वेगळा विषय हाताळला आहे. त्यामुळे "सोबत" या चित्रपटाचाही त्याला अपवाद ठरणार नाही.
'सोबत'मध्ये नव्या-जुन्या कलाकारांचा कसदार अभिनय पहायला मिळणार आहे. हिमांशू विसाळे आणि मोनालिसा बागल ही फ्रेश जोडी या चित्रपटात आहे. तसंच रुचिरा जाधव, गिरीश परदेशी, स्मिता गोंदकर, नागेश भोसले, प्रदीप वेलणकर, विजय गोखले, मनोज टाकणे, अभिलाषा पाटील, अश्विन पाटील, कौस्तुभ जोशी या कलाकारांचा चित्रपटात समावेश आहे.
सैराट या चित्रपटात आपल्याला अार्ची आणि परशा या अल्पवयीन जोडप्याची प्रेमकथा पाहायला मिळाली होती. या चित्रपटाच्या यशानंतर आजवर अशाच आशयाचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत असून या चित्रपटांना देखील प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. सोबत या चित्रपटाला देखील प्रेक्षक तितकाच प्रतिसाद देतील अशी चित्रपटाच्या टीमला खात्री आहे.
Also Read : मोनालिसा बगलच्या फॅन फॉलॉव्हिंगमध्ये वाढ