‘त्या’ सगळ्या अफवा! म्हणून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरला रूग्णालयात भरती केले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 10:30 AM2021-03-03T10:30:58+5:302021-03-03T10:32:47+5:30
फर्जंद, फत्तेशिकस्त यांसारखे चित्रपट देणारा तरुण दिग्दर्शक म्हणून दिग्पाल लांजेकर याला हार्ट अटॅक आल्याची बातमी आली आणि चाहत्यांना धक्का बसला. पण आता या अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे.
फर्जंद, फत्तेशिकस्त यांसारखे चित्रपट देणारा तरुण दिग्दर्शक म्हणून दिग्पाल लांजेकर याला हार्ट अटॅक आल्याची बातमी आली आणि चाहत्यांना धक्का बसला. पण आता या अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे. होय, दिग्पालला अति ताणामुळे त्रास झाला आणि त्याला पुण्यात रूग्णालयात भरती करण्यात आले. तथापि त्याची प्रकृती स्थिर आहे.
दिग्पाल सध्या ‘पावनखिंड’ या चित्रपटाच्या प्रदर्शनात व्यग्र आहे. याचदरम्यान त्याना अति ताणामुळे अस्वस्थ वाटू लागले. यानंतर त्याला रूग्णालयात भरती करण्यात आले. सध्या काळजीचे काहीही कारण नसून डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सौमित्र पोटे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. शिवाय अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही केले आहे.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याला हार्ट अटॅक आल्याच्या बातम्या येतायत. त्या अफवा आहेत. अति ताणामुळे त्याला त्रास झाला. तो पुण्यात ऍडमिट आहे. काळजीचं कारण नसून त्याला आरामाची गरज आहे असं डॉक्टरांनी कळवलं आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका.@abpmajhatvpic.twitter.com/nDMdbyNcOo
— Soumitra Pote । सौमित्र पोटे (@soumitrapote) March 2, 2021
काल दिग्पालला हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या आल्या होत्या. यामुळे चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. शिवाय अफवांना उधाण आले होते. त्याला हृदयविकाराचा झटका आला, त्याला कोरोना झाला, अशा काय काय अफवा पसरल्या होत्या. मात्र आता या बातम्यांमध्ये तथ्य नसून केवळ अति ताण आल्यामुळे हा त्रास झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी दिग्पाल आणि सहकारी सुश्रुत मंकणी पुण्याहुन मुंबईला चालले होते. वाटेत अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. दिग्पाल काही वेळ बेशुद्धही झाला यानंतर त्याला तात्काळ पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटल मध्ये दाखल केले गेले.
दिग्पालच्या फर्जंद, फत्तेशिकस्त आदी चित्रपटांना रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. अभिनयाच्या बाबतीतही तो आपली वेगळी छाप पाडतो.