रूपेरी पडद्यावर जुळणार ‘३६ गुण’,दिग्दर्शक समित कक्कडचा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 08:00 AM2019-01-13T08:00:00+5:302019-01-13T08:00:00+5:30

या सिनेमाचे लंडन मधले चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून समित कक्कड फिल्म्स आणि मोहन नाडर यांच्या बिझी बी प्रोडक्शन्सची निर्मिती असलेला ’३६ गुण’ सिनेमा लवकरच रसिकांच्या  भेटीला येणार आहे.  

Director Samit Kakkad New Marathi Movie 36 Goon Releasing Soon | रूपेरी पडद्यावर जुळणार ‘३६ गुण’,दिग्दर्शक समित कक्कडचा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला

रूपेरी पडद्यावर जुळणार ‘३६ गुण’,दिग्दर्शक समित कक्कडचा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला

googlenewsNext

आशय आणि तंत्राची उत्कृष्ट सांगड घालून दिग्दर्शक समित कक्कड यांनी ‘आयना का बायना’, ‘हाफ तिकीट’ अशा मराठी सिनेमातून आपलं कौशल्य सिद्ध केलेलं आहे. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवर मान-सन्मान मिळवून मराठी सिनेमाला जागतिक ओळख मिळवून दिली आहे. नेटफलिक्सवर नुकताच प्रदर्शित झालेला मंटोच्या पात्रांवर आधारित ‘आश्चर्य चकीत’ हा बहुचर्चित सिनेमाही सिनेरसिकांच लक्ष वेधून घेतोय आणि समित कक्कडने केलेल्या या धाडसाचे सगळ्यांकडून कौतुक केलं जातंय. असाच एक वेगळ्या विषयावर बेतलेला ’३६ गुण’ हा नवा सिनेमा घेऊन समित कक्कड पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमाचे लंडन मधले चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून समित कक्कड फिल्म्स आणि मोहन नाडर यांच्या बिझी बी प्रोडक्शन्सची निर्मिती असलेला ’३६ गुण’ सिनेमा लवकरच रसिकांच्या  भेटीला येणार आहे.  

 वेगळे विषय, वेगळं सादरीकरण आणि दरवेळी नाविन्यपूर्ण प्रयोग करणारा दिग्दर्शक समित कक्कड नुकतंच लंडनला ‘३६ गुण’ नावाचा सिनेमा चित्रित करून आले असून, या चित्रपटाचे उर्वरित चित्रिकरण गोव्यात होणार आहे. संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात समित कक्कड यांनी भन्नाट कुंडली जुळवल्याने हा चित्रपट जमून आलेला आहे.  लिखाणाच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीसाठी प्रसिद्ध असलेले यशस्वी चित्रपट लेखक हृषिकेश कोळी सोबत ‘आश्चर्य चकित’, ‘बच्चन’ आणि ‘३६ गुण’ असे सलग तीन चित्रपट करत असल्याने  आगामी काळात समित कक्कड यांचे हे सगळे सिनेमे रुपेरी पडदा नक्कीच गाजवतील व त्यांचे ‘३६ गुण’ रसिकप्रेक्षकांना आश्चर्यचकीत करतील ह्यात शंकाच नाही. प्रसाद भेंडे यांनी ‘३६ गुण’ चित्रपटाचे छायांकन केले आहे तर पराग संखे यांनी लाईन प्रोड्युसरची जबाबदारी सांभाळत या चित्रपटाच्या लंडनमधील चित्रीकरणासाठी विशेष सहकार्य केले आहे.

Web Title: Director Samit Kakkad New Marathi Movie 36 Goon Releasing Soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.