मराठी मालिकेत ब्राह्मण अभिनेत्रींचाच वावर, सुजय डहाके या विधानामुळे सापडला वादाच्या भोवऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 11:17 AM2020-03-05T11:17:14+5:302020-03-05T11:18:11+5:30
सुजय डहाकेच्या जातीयवादाच्या स्टेटमेंटमुळे सोशल मीडियावर वेगळाच वाद रंगताना दिसतोय
जात आहे ती जात नाही अशी काहीशी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. जातीयवाद विषयामुळे नेहमीच वेगळेच राजकारण पाहायला मिळते. यावर एका मुलाखतीत मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक सुजय डहाकेच्याही वक्तव्याने हा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
सगळ्या मराठी मालिकांमध्ये ब्राह्मण अभिनेत्रीचं मुख्य भूमिकेत का आहेत, असा प्रश्न सुजय डहाकेने एका मराठी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत विचारला. त्याने मराठी सिनेइंडस्ट्रीतील जातीय भेदभाव असल्याचे म्हटलं. या विधानामुळे सोशल मीडियावर वेगळाच वाद रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सुजय डहाकेने या मुलाखतीत त्याने मराठी मालिकांमध्ये ब्राह्मण अभिनेत्रींनाच मुख्य भूमिकेसाठी संधी दिली जात असल्याचे म्हटलं. तो पुढे म्हणाला की, जेवढे मराठी चॅनेल्स आहेत त्यातील मालिकांमध्ये ब्राह्मण नसलेली अभिनेत्री मुख्य भूमिकेत काम करते आहे, ते शोधून पाहण्याचा प्रयत्न करा. या लोकांना जाधव, सोनावणे, टेंभुर्णी, मडके सापडत नाहीत का?.
जातीय भेदाचा अनुभव खुद्द सुजय डहाकेने घेतला असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, मी स्वतः एका मीटिंगमध्ये होतो तिथे पण जाधव लागू बंधूंची जाहिरातीत काम कशी करेल? असा प्रश्न त्यांना पडला होता. हे खरे वास्तिवक आहे.
यादरम्यान सुजय डहाकेने तुझ्यात जीव रंगला आणि माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या नायिकांचा संदर्भ दिला.
सुजय डहाकेने केलेल्या वक्तव्यावर अभिनेत्री तेजश्री प्रधानने सोशल मीडियावर तिचे मत मांडले आहे. तिन म्हटले की, मी ब्राम्हण नाही पण सीकेपी आहे. गेल्या कित्येक वर्षापासून माझ्याकडे कामही आहे. काम हे टॅलेंट मुळेच मिळाले असल्याचे तिने म्हटले आहे.
सुजयच्या मतावर संमिश्र प्रतिक्रीया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे.