‘डिस्को सन्या’ चं रहस्य उलगडणार जूूनमध्ये...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2016 01:24 PM2016-05-10T13:24:41+5:302016-05-10T18:54:41+5:30
‘डिस्को सन्या’ म्हणजे नक्की काय ? किंवा डिस्को सन्या या नावाचा अर्थ काय होतो? असे प्रश्न साहजिकच तुमच्या मनात ...
‘ िस्को सन्या’ म्हणजे नक्की काय ? किंवा डिस्को सन्या या नावाचा अर्थ काय होतो? असे प्रश्न साहजिकच तुमच्या मनात आले असतीलच ना? कारण मराठी सिनेसृष्टीत नव्याने आलेले डिस्को सन्या हे नाव काही कालावधीनंतर प्रत्येक माणसाच्या ओठी असणार. त्याचे कारणही लवकरच सर्वांना कळणार आहे...केवळ नाच, गाणी, हसविणे म्हणजे मनोरंजन नाही तर गोष्टीतील रहस्यमय थ्रिलर हेही मनोरंजन होऊ शकते हे पटवून देण्यासाठी वकाव् फिल्म्सने डिस्को सन्या चित्रपटाची निर्मिती केली असून ही त्यांची पहिलीच निमीर्ती आहे. त्यामुळे डिस्को सन्या या फिल्म विषयीचे कुतूहल नक्कीच वेगळे असणार आहे. येत्या जूनमध्ये डिस्को सन्याविषयी प्रेषकांना कळेल.
वकाव् फिल्म्स निर्मीत डिस्को सन्या या चित्रपटाची निर्मिती सचिन पुरोहित व अभिजीत कवठाळकर यांनी केली आहे तर दिग्दर्शनाची धुरा नियाज मुजावर यांनी सांभाळली असून त्यांनी लिहिलेल्या गीतांना अभिजीत कवठाळकर व सचिन पुरोहित यांचे उत्तम संगीत लाभले आहे.
या चित्रपटाचे प्रमोशनल साँग हे सुप्रसिद्ध गायक अवधुत गुप्ते यांनी गायले आहे. या गाण्यांना सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे व नंदेश उमप यांनी आपल्या जादूई सुरावटींची, तालाची मोहिनी घातली आहे. तसेच गायक रिषभ पुरोहित व शबाब साबरी यांनीही गाण्यांमध्ये आपल्या आवाजाचा साज चढविला असून सर्वच वयोगटातील श्रोत्यांना ही गाणी आवडतील यात शंकाच नाही. सिनेमाची कथा व पटकथा नियाज मुजावर, सचिन पुरोहित व अभिजीत कवठाळकर आहेत.
सिनेमाच्या कथेबाबत तसेच कलाकारांबाबत सध्या तरी गुप्तता पाळण्यात आली आहे. डिस्को सन्या म्हणजे काय? या प्रश्नाच्या उत्तरासाठी चित्रपटाबद्दल उत्कंठा निर्माण झाली आहे एवढं मात्र नक्की! परंतू त्यासाठी थोडी वाट पहावी लागणार आहे. तोपर्यंत चला विचार करा डिस्को सन्या म्हणजे नक्की काय असणार ते?