बोल्ड सीन्स करण्यापूर्वी उमेशसोबत चर्चा करतेस का?, त्यावर प्रिया बापट म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 12:36 PM2023-07-06T12:36:16+5:302023-07-06T12:36:55+5:30
Priya Bapat : प्रिया बापट हिने 'सिटी ऑफ ड्रिम्स' या वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन दिले होते. यामुळे तिला खूप ट्रोल केले होते.
अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात आणि त्यांच्या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. त्या दोघांच्या खासगी आयुष्यासोबत प्रोफेशनल लाइफबाबत जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान नुकतीच प्रिया बापट हिने एका मुलाखतीत बोल्ड सीन्स करण्यापूर्वी उमेशसोबत चर्चा करते का, याबद्दल सांगितले.
प्रिया बापट हिने सिटी ऑफ ड्रिम्स या वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन दिले होते. लेसबियन किसिंगमुळे तिला खूप ट्रोल केले होते. दरम्यान आता प्रियाने महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोल्ड सीन्स करण्यापूर्वी उमेशसोबत चर्चा करते का, या प्रश्नाचं उत्तर दिले आहे. ती म्हणाली की, आम्ही एकमेकांना त्याबद्दल सांगतो. उमेशपेक्षा मीच असे सीन्स जास्त केले आहेत. मी केलेल्या सीरिजमध्ये आणि आगामी काही हिंदी प्रोजेक्टमध्ये असे सीन्स आहेत. एकाच क्षेत्रात असल्यामुळे असे प्रसंग किती टेक्निकल असतात हे आम्हाला दोघांना माहित आहे. ते चित्रीत कसं झाले याचीही आम्हाला माहिती असते. त्यामुळे आम्ही त्याकडे फक्त कामाचा एक भाग म्हणून पाहतो.
जोडीदाराचा पाठिंबा मिळणं खूप महत्त्वाचं असतं
या व्यतिरिक्त त्यांच्यातील नवरा-बायकोचं नातं ते त्यांच्यात असणारी मैत्री यावर प्रियाने भाष्य केले. ती म्हणाली की, जोडीदाराचा पाठिंबा मिळणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे तुम्ही करिअरमधील निर्णय शांतपणे, विचारपूर्वक आणि कोणत्याही चिंतेविना घेऊ शकता.