प्रथमेशच्या या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2016 11:36 AM2016-12-02T11:36:56+5:302016-12-02T12:13:15+5:30
अभिनेता प्रथमेश परबने त्याच्या हटके स्टाईलने सर्वांनाच वेड लावले होते. डायलॉग बॉलण्याचा अंदाज असो किंवा डान्सींगची अजब स्टेप प्रथमेश ...
अ िनेता प्रथमेश परबने त्याच्या हटके स्टाईलने सर्वांनाच वेड लावले होते. डायलॉग बॉलण्याचा अंदाज असो किंवा डान्सींगची अजब स्टेप प्रथमेश अल्पावधीतच घराघरात पोहचला. हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से अमीर है हम जियेंगे अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से चला, हवा येऊ द्या हा डायलॉग कानावर पडला की डोळ्यासमोर येतो तो दगडू अर्थातच 'टाइमपास'मधला प्रेक्षकांचा लाडका प्रथमेश परब. नुकतीच त्याने वयाची २३ वर्षे पूर्ण केली आहेत. २९ नोव्हेंबर १९९३ रोजी मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला. बालक पालक, टाइमपास, उर्फी या सिनेमांमुळे तो आता स्टार बनलाय. मात्र त्याचा हा प्रवसा खडतर परिस्थितीशी झगडत झालाय. नुकताच प्रथमेशचा वाढदिवस झाला. आज प्रथमेश मराठी चित्रपटसृष्टीत चांगलाच जम बसवून आहे. परंतू एकेकाळी त्याच्या घरची बेताची परिस्थिती बेताची होती. प्रथमेशला एक धाकटा भाऊ आहे. अंधेरी इस्टच्या नामदेव मिश्रा चाळीमधल्या एका सर्वसामान्य कुटुंबातून प्रथमेश आहे. वडील कँटीनमध्ये नोकरी करतात. तर आईदेखील एका कारखान्यात कामाला होती. मात्र आता प्रथमेशने स्वबळावर घरची परिस्थिती बदलली आहे. प्रथमेशला गेल्यावर्षी मुंबईतील सायन परिसरात म्हाडाचे घर मिळाले आहे. ''मला घर लागलंय याचा मला खूप आनंद झाला आहे. प्रत्येकाचे स्वप्न असते, की आपले मुंबईत घर असावे. माझे हे स्वप्न म्हाडामुळे पूर्ण झाले. माझी इच्छा होती की, मला सायनला घर मिळावे आणि तिथे कलाकारांसाठी केवळ एकच जागा असल्यामुळे ते थोडे कठीण होते. पण, मला प्रतिक्षानगरमध्ये (सायन) घर मिळाले. माझ्या आईबाबांच्या कष्टामुळेचे हे होऊ शकले आहे.'' असे प्रथमेश म्हणाला होता.