साडीतील या चिमुकलीला ओळखलंत का?, वडील होते मराठी कलाविश्वातील सुपरस्टार, तर आईपण आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 03:12 PM2023-10-17T15:12:00+5:302023-10-17T15:12:34+5:30

आता सोशल मीडियावर एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. साडीत गोंडस स्माइल देणाऱ्या या चिमुकलीला ओळखलंत ना. या अभिनेत्रीचे वडील मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार होते आणि आई प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Do you know this little girl in a saree? Her father was a superstar in the Marathi art world, and her mother is an actress | साडीतील या चिमुकलीला ओळखलंत का?, वडील होते मराठी कलाविश्वातील सुपरस्टार, तर आईपण आहे अभिनेत्री

साडीतील या चिमुकलीला ओळखलंत का?, वडील होते मराठी कलाविश्वातील सुपरस्टार, तर आईपण आहे अभिनेत्री

कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यासाठी चाहते सोशल मीडियावर कलाकारांना फॉलो करत असतात. कलाकार बऱ्याचदा बालपणींच्या आठवणीत रमतात आणि ते आपला फोटो आणि आठवणी चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असतात. दरम्यान आता सोशल मीडियावर एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. साडीत गोंडस स्माइल देणाऱ्या या चिमुकलीला ओळखलंत ना. या अभिनेत्रीचे वडील मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार होते आणि आई प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे.

स्वानंदीने बालपणीचा म्हणजेच २० वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे. त्यात ती साडीत दिसते आहे. त्यानंतर तिने तिचे आताचे फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले की, साडीवरचे प्रेम अपरमपार. तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

अभिनेत्री सुरुची अडारकरने लिहिले की, किती गोड. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निखिल बनेने हार्टची इमोजी शेअर केली आहे. तर एका युजरने म्हटले की, मराठमोळी मुलगी लयभारी. दुसऱ्या युजरने लिहिले की, छोटीशी स्वानंदी.

स्वानंदी बेर्डेच्या वर्कफ्रंटबद्दल...
लक्ष्मीकांत बेर्डे यांनीदेखील नाट्य क्षेत्रातूनच सिनेकारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत स्वानंदीदेखील नाटकातून आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली आहे. धनंजय माने इथंच राहतात या नाटकातून स्वानंदीने रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर आता ती चित्रपटात झळकते आहे. स्वानंदीने 'रिस्पेक्ट' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. किशोर बेळेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात सात महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे.
 

Web Title: Do you know this little girl in a saree? Her father was a superstar in the Marathi art world, and her mother is an actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.