'खरं दु:ख काय असतं माहितीये का?'; क्रांती रेडकरने व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 13:47 IST2023-10-05T13:46:53+5:302023-10-05T13:47:44+5:30
Kranti redkar: क्रांतीने इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

'खरं दु:ख काय असतं माहितीये का?'; क्रांती रेडकरने व्यक्त केली खंत
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर (kranti redkar). अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये झळकलेली क्रांती सध्या छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडताना दिसत आहे. यासोबतच ती सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. त्यामुळे कायम नवनवीन पोस्ट ती शेअर करत असते. यात नुकताच एक व्हिडीओ तिने पोस्ट केला असून यात दु:खाची व्याख्या मजेशीर पद्धतीने सांगितली आहे.
क्रांती सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह आहे. त्यामुळे ती कायम लहान लहान रिल्स करुन ते चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात कधी तिच्या मुलींच्या गंमतीजंमती ती सांगते. तर, काही वेळा तिच्या दैनंदिन आयुष्यात घडलेला किस्सा. यावेळी तिने असाच एक मजेशीर किस्सा शेअर केला आहे. यात कपड्यांची साईज योग्य न होणं हे किती मोठं दु:ख आहे हे तिने सांगितलं आहे.
"तुम्हाला माहिती आहे का खरं दु:खं काय असतं.. खरं दुख म्हणेज मीडियम साईजच्या कपड्यांमध्ये तुम्ही फिट होत नाही. कारण, ते तुम्हाला टाईट होतात. आणि, लार्ज साईजचे कपडे तुम्ही घातले तर ते तुम्हाला लूज होतात. त्यामुळे जर दोन साईजच्या मध्ये तुम्ही असाल तर तुमच्यासारखे दु:खी तुम्हीच. त्यातलीच एक मी. कळलं..", असं क्रांती तिच्या व्हिडीओमध्ये बोलताना दिसते.
दरम्यान, क्रांतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. इतकंच नाही तर आमचीही अवस्था अशीच आहे असंही काहींनी म्हटलं आहे.