​तुम्हाला माहीत आहे का चित्रपटसृष्टीत येण्याआधी बँकेत काम करायचे अशोक सराफ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 12:15 PM2017-08-04T12:15:43+5:302017-08-04T19:26:42+5:30

अशोक सराफ आज मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार आहेत. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, अशी ही बनवाबनवी अशा अनेक ...

Do you know why Ashok Saraf was working at the bank before coming to the film industry? | ​तुम्हाला माहीत आहे का चित्रपटसृष्टीत येण्याआधी बँकेत काम करायचे अशोक सराफ?

​तुम्हाला माहीत आहे का चित्रपटसृष्टीत येण्याआधी बँकेत काम करायचे अशोक सराफ?

googlenewsNext
ोक सराफ आज मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार आहेत. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हम पाच या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर तर आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. अशोक सराफ यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येदेखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या ते शेंटिमेंटल या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकत आहेत. चित्रपटसृष्टीत येण्याआधी ते एका बँकेत काम करत होते हे खूपच कमी जणांना माहिती आहे. त्यांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केल्यानंतरही काही वर्षं त्यांनी बँकेत काम केले. 
त्यांच्या बँकेतील नोकरीविषयी त्यांनी स्वतःच सीएनएक्सशी बोलताना सांगितले आहे. ते सांगतात, मी १९७४ला पहिला चित्रपट केला. पण त्यानंतरही मी बँकेत नोकरी करणे सोडले नव्हते. पण चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे मला नोकरीला जाणे जमायचे नाही. १९७८ला तर संपूर्ण वर्षभर मी बँकेत गेलोच नव्हतो. मला बरे नाही असे सांगत मी मेडिकल सर्टिफिकेट दिले होते. पण मी काही महिने ऑफिसला गेलेलोच नसल्याने माझ्या ऑफिसमधील काही वरिष्ठ घरी आले. मी त्यावेळी घरी नव्हतो. माझ्या बहिणीने दरवाजा उघडला. मी कुठे आहे असे तिला विचारले असता मी कोल्हापूरला गेलो असल्याचे तिने सांगितले. या तिच्या उत्तराने आता माझी वाट लागली असेच मला वाटले होते. पण माझ्या बँकेतील लोकांनी मला खूप सांभाळून घेतले. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण त्यांनी माझा रिपोर्ट तीन महिने वरिष्ठांना दिलाच नव्हता. माझ्या बँकेतील मंडळी माझ्या वाटणीची कामे करत असत. मी चित्रपटात काम करत असलो तरी नोकरी सोडण्याचा धोका मी पत्करू शकत नव्हतो. त्यामुळे मला नोकरीतून हकलून देत नाही तोपर्यंत मी नोकरी सोडणार नाही असेच मी ठरवले होते. पण अखेर माझ्यामुळे माझ्या सहकर्मचाऱ्यांना त्रास होत आहे असे मला वाटल्याने मी नोकरी सोडली.

Also Read : चांगल्या भूमिका असल्याशिवाय काम करणार नाहीः अशोक सराफ

Web Title: Do you know why Ashok Saraf was working at the bank before coming to the film industry?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.