लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत झळकलेली ही अभिनेत्री आठवतेय ना; आता दिसते अशी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 07:00 AM2022-01-08T07:00:00+5:302022-01-08T07:00:00+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतल्या या अभिनेत्रीला आता ओळखणं झालंय कठीण
मराठी सिनेइंडस्ट्रीत नव्वदच्या दशकात काम केलेले बरेच कलाकार आता चित्रपटसृष्टीतून गायब आहेत. त्यांनी अभिनय क्षेत्राचा निरोप घेऊन इतर क्षेत्रात करिअर करण्याला प्राधान्य दिले आहे. अशीच नव्वदच्या दशकातील एक अभिनेत्री म्हणजे स्मृती तळपदे. १९९० साली रिलीज झालेला चित्रपट कुलदीपमध्ये स्मृती तळपदे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केले होते. या चित्रपटानंतर त्यांनी इंडस्ट्रीला राम राम केला आणि डान्स अकॅडमी सुरू करून इतरांना नृत्याचे धडे देत आहेत.
कुलदीपक चित्रपटानंतर स्मृती तळपदे दुसऱ्या कोणत्या चित्रपटात पाहायला मिळाल्या नाहीत. मात्र लक्ष्मीकांत बेर्डे आणि स्मृती या दोघांवर चित्रित झालेले इस्पिक, चौकट, किलवर, बदाम… तुझीच राजा होईल गुलाम हे गाणे त्यावेळी खूप गाजले होते. त्यामुळे तृप्ती तळपदे प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहिल्या होत्या.
कुलदीपकमध्ये स्मृती तळपदे यांनी कमलची भूमिका साकारली होती. कमल ही किरणचा( सविता प्रभुणे) भाऊ राजा म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या प्रेमात पडते. या दोघांवर इस्पिक चौकट किलवर बदाम हे गाणे शूट झाले होते. स्मृती तळपदे कुलदीपक चित्रपटानंतर अभिनय क्षेत्रात फारशा रमल्या नाहीत.
अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांच्या आई आणि नृत्य शिक्षिका आशा जोगळेकर यांच्याकडून स्मृती तळपदे यांनी कथकचे धडे गिरवले आणि कालांतराने त्यांनी यातच आपले करिअर करायचे ठरवले. गेल्या कित्येक वर्षांपासून अंधेरी, मुंबई येथे त्यांची नृत्य स्मृती या नावाने डान्स अकॅडमी आहे. या अकॅडमीमधून त्यांनी अनेकांना नृत्याचे धडे दिले आहेत.